ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सर्वोत्कृष्ठ बँक असलेल्या कृष्णा बँकेचे ग्राहक व्हा – सी ई ओ भगवान जाधव

गोडोली प्रतिनिधी : अकराशे कोटीहून अधिक एकत्रित व्यवसाय,एनपीए शुन्य टक्के, मोबाईल बँकिंग सेवा, सतत ऑडीट ‘अ’ वर्ग असणारी कृष्णा सहकारी बँक आहे. चेअरमन आमदार डॉ.अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांसाठी अर्थवाहिनी म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या बँकेला राज्यातील सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. म्हणून ग्राहकांना कृष्णा बँक ही आपली बँक वाटते. कर्ज असो वा ठेवी असो, या बँकेशी सातारकरांनी हक्काने ग्राहक व्हा,” असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी केले.

कृष्णा सहकारी बँकेच्या सातारा शाखेचा नुकताच ग्राहक मेळावा पार पडला.या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती कृष्णा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, संचालक राजेंद्र कुंभार, अभिजित दोशी,सी.यू. कटारिया यांच्यासह सातारा शहरातील विविध मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संखेने उपस्थित होते.

सातारा शाखेचे शाखाधिकारी शशिकांत कसबे यांनी,’ बँकेची वैशिष्टे सांगताना मोबाईल बँकिंग, लॉकर सुविधा, शासनाच्या विविध विमा योजनांचा लाभ देणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेत ठेवीवर आकर्षक व्याजदर आहे.पोवई नाक्यावरील रामकृष्ण कॉलनी येथील सातारा शाखेत ठेवी आणि कर्जासाठी सातारकरांनी संपर्क करावा,’असे आवाहन केले.

यावेळी हेमंत देशमुख, राजेंद्र साळुंखे, राजन माने, हणमंतराव माने- पाटील , विद्या जाधव, विजयसिंह पाटील, नितीन पिसाळ, चंद्रकांत निलजीकर, प्रशांत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बँकेचे संचालक राजेंद्र कुंभार यांनी तर आभार विजय जाधव यांनी मानले.

Scroll to Top