ताज्या बातम्या

ठाकरे गट कल्याणमध्ये करेक्ट कार्यक्रम करणार

प्रतिनिधी : लोकसभेचा पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस राहिले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीचे जाटावाटप आणि उमेदवारी अद्याप निश्चित होताना दिसत नाही. तसेच उमेदवारी मिळावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या दिल्लीवारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली असून, केदार दिघे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top