ताज्या बातम्या

समाजरत्न पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवे सन्मानित

प्रतिनिधी : मालदन (ता.पाटण) येथील प्रगती चॅरिटेबल ट्रस्टच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा.ए.बी.कणसे, लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पाचुपते, निर्मल ग्रामपंचायत मान्याचीवाडीचे आदर्श सरपंच रविंद्र माने, श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था व निवासी गुरुकुल रामिष्टेवाडीचे ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे महाराज, हेल्पिंग नेचर विक्रमा जनहितार्थ सेवाभावी संस्थेचे विक्रम पाटील, जयवंत मोरे, विठ्ठलराव पाचुपते व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डाॅ.संदीप डाकवे यांना प्रदान करण्यात आला.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आतापर्यंत शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे. याशिवाय ‘प्राईड ऑफ स्पंदन’ या पुरस्कार सोहळयाच्या माध्यमातून दिग्गजांसोबत नवोदित व्यक्तिंनाही गौरवले आहे.
दरम्यान, सर्व उपस्थितांना नागरिकांसाठी प्लॅस्टिक निर्मूलन संदेश कापडी पिशवी वाटप करण्यात आले. तसेच गावातील ज्या परिवारात मुलगी जन्माला आली आहे त्यांना बेटी बचाव ठेवपावती देवून सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top