ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे यांची नियुक्ती

प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यात कराड येथील शिवराज मोरे यांची शनिवारी प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

युवक काँग्रेस मधील संघटनात्मक पातळीवरील हे फेरबदल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहेत. शिवराज मोरे यांना नुकतेच दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या तसेच राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलवेरू यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते.
शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची दोनदा जबाबदारी सांभाळली आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती सुद्धा झाली होती. प्रदेश युवक काँग्रेसच्या दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवराज मोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
एका सामान्य कुटुंबातील शिवराज मोरे यांनी आपल्या संघटनेच्या जोरावर राज्यभर आपले युवकांचे संघटन वाढवले आहे. या नियुक्तीमुळे राज्यभरातून युवक काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. चांगले काम करण्याची संधी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून मी पुढील काळात वाटचाल करणार आहे. काँग्रेसला चांगले दिवस आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. त्यासाठी युवक संघटना अधिकाधिक बळकट करण्यासाठी भर देऊ असे शेवटी शिवराज मोरे म्हणाले.

Scroll to Top