ताज्या बातम्या

विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे पिस्तूल पकडले कराडातील पंकज हॉटेल परिसरात सापळा; पिस्तूल जप्त

कराड (वार्ताहर) : शहरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले. शुक्रवारी (दि. २०) पंकज हॉटेलच्या पाठीमागील परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि कराड शहर पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रतिबंधक विभाग शहरात गस्त घालत असताना, पंकज हॉटेलच्या पाठीमागे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक घोडके यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक यादव यांना सूचना देऊन संबंधित इसमाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, पोलीस अंमलदार शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, अरुण पाटील, राजू कांबळे, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, स्वप्नील लोखंडे, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम तसेच, कराड शहर पोलीस ठाण्याचे सज्जन जगताप, व विजय गुरव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Scroll to Top