ताज्या बातम्या

ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे राजापूर तर्फे “कोकणचे नमन” २३ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात

मुंबई (शांताराम गुडेकर) :ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे राजापूर आयोजित आणि आम्ही कोकणकर प्रस्तुत स्त्री पुरुष पात्रांनी नटलेले नाविण्यपूर्ण ‘कोकणचे नमना’ चा भव्य शुभारंभाचा प्रयोग सोमवार दि २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं ७.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी मंदिर दादर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
“वारसा पूर्वजांच्या पुण्याईचा”आपल्या कोकण संस्कृतीचा’ नाद घुमला कोकणचा कहाणी कोकणच्या वैभवशाली लाल मातीतील कृष्णा नंदा शांताराम येद्रे लिखित दिग्दर्शित नमन नाट्यकला कृती संगीत संयोजक मिलिंद रेश्मा विनायक ठीक, नृत्य दिग्दर्शक सिध्दी सांडये (नांदगावची राधा) आणि प्रोजेक्ट हेड रमेश शिरगावकर, नेवा पाटील आणि आनंद सनगरे असून सप्तसुरांच्या संगीतात मंत्रमुग्ध होण्यासाठी भक्तीमय गण, सुमधुर गाणी, साज शृंगारमय स्त्री पुरुष पात्रांनी सजलेल्या गवळणींचा नृत्याविष्कार, कृष्णलीला अनुभवण्यासाठी, डोळ्याचे पारणे फेडणारे भव्य दिव्य ‘कोकणचे नमन’ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे अधिक माहितीसाठी गणेश कुळये – 7208738216 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Scroll to Top