ताज्या बातम्या

धगधगती मुंबईचे प्रतिनिधी प्रताप भणगे यांना ‘प्राईड ऑफ स्पंदन’ पुरस्कार जाहीर!

कराड : धगधगती मुंबई वृत्तपत्राचे सातारा जिल्हा, कराड प्रतिनिधी पत्रकार प्रताप भणगे यांना ग्रामीण पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘प्राईड ऑफ स्पंदन’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्या, स्वच्छता मोहिमा तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडली. त्यांच्या बातम्यांची प्रशासनाने दखल घेऊन अनेक समस्या तातडीने मार्गी लावल्या आहेत. त्यांच्या या लोकाभिमुख पत्रकारितेची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित स्पंदन अवॉर्ड सोहळ्यात प्रताप भणगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या ग्रामीण भागातील प्रतिनिधीच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. संदीप डाकवे यांचे वृत्तपत्र परिवाराच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या पुरस्काराची घोषणा होताच प्रताप भणगे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Scroll to Top