ताज्या बातम्या

भाजप निष्ठावंत पाटोळे यांच्यावर लाभार्थीने टीका करू नये- श्री शेखर पाटोळे

दहिवडी(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासामध्ये मिठाचा खडा टाकणारे जावळी खोऱ्यातील चंद्रराव मोरे यांनी गद्दारी केली. आजही त्यांचे अंश बाकी आहे. असं दिसून येत आहे. ही खेदाची बाब आहे. दुष्काळी माण- खटाव तालुक्यातील विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या भाजप समर्थक मागासवर्गीय मातंग समाजातील शेखर पाटोळे हे भाजप निष्ठावंत आहे. त्यांच्यावर वैचारिक भूमिका मांडणाऱ्या निष्ठावंत व्यक्तींनीच योग्य टीका केली तर त्याचे स्वागत केले जाईल. पण, व्यक्तिगत लाभार्थीने कृपया टीका करू नये .तेवढी त्यांची पात्रता नाही. जे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या भाड्यावर जगतात. त्यांनी उपदेश देऊ नये. हीच विनंती असल्याचे स्पष्ट मत भाजप समाज माध्यमावरील कार्यकर्ते शेखर पाटोळे यांनी व्यक्त केले आहे. मीच काय पण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर वाटचाल करूनच प्रगती करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे सर्वांसाठी आदर्श व नतमस्तक होण्यासारखे व्यक्तिमत्व आहे. आमचे आदरणीय नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे स्वप्नात सुद्धा छत्रपतींचे वंशज किंवा आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका करणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. वैचारिक मतभेद किंवा राजकीय डावपेच करत असताना त्यांनी कधीही चिंगूसपणा केला नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. भाजप पक्षासाठी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलेले आहे. शेखर पाटोळे यांनी गेली १८ वर्ष भाजपचे झेंडे बांधण्यापासून ते मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची चहापान व पक्षाच्या जाहीरनामा मतदारांना देण्यापर्यंत काम इमाने इदबारी केले आहे. यापुढेही भाजप सामान्य कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत राहणार आहेत. जावळी- महाबळेश्वर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे व मायाळू तसेच कष्टकरी- शेतकरी यांच्या भाग भांडवलावर उभ्या केलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर देऊन त्या भाड्यावर जगणाऱ्यांनी श्री पाटोळे यांच्यासारख्या निष्ठावंतांवर टीका करणे हाच मोठा विनोद आहे. सामान्य कुटुंबातील भाजप कार्यकर्ते शेखर पाटोळे हे स्वकर्तबगारीवर आजही हातात खुरप घेऊन शेतमजूर म्हणून शेतात काम करण्याची तयारी ठेवत आहेत . असे श्री पाटोळे यांनी स्पष्ट केले आहे. चार वेळा प्रतापगड सहकारी साखर कारखाना भाड्याने दिल्यामुळेच परिसरातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जावळी तालुक्यातील गावातील ऊसाचे गाळप केले जात आहे. विरोधकांचा ऊस प्रतापगडला नोंद न करता त्यांना शेजारील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे द्वार खुले केले आहे. त्या टीका करणाराचे खर म्हणजे किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याने निश्चितच आभार मानले पाहिजे. चार वेळा साखर कारखाना भाड्याने देण्याची वेळ आणली आहे. अशा कर्तबगार व्यक्तींची टीका आम्ही कधीच स्वीकारणार नाही. परंतु, आम्ही चार वेळा भाडे तत्त्वावर दिलेल्या साखर कारखान्याची साखर खाऊन गप्प बसलो तर त्याचा जावळी तालुक्यात वेगळा अर्थ काढला जाईल म्हणून हा खुलासा करत आहे. वास्तविक सत्तेसाठी भुकेलेल्यांना उत्तर देण्याची पात्रता नाही. असं खेदाने नमूद करावे वाटते. तरीही शेखर पाटोळे यांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे. हा त्यांनी सन्मान समजावा असेही पत्रकार श्री पाटोळे यांनी नमूद केले आहे.

Scroll to Top