सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी कराडचे ॲड. उदयसिंह (उदयदादा) विलासराव पाटील उंडाळकर यांची निवड निश्चित झाल्याची बातमी धगधगती मुंबईचे सातारा जिल्हा वरिष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी यापूर्वीच दिली होती. त्यांची ही बातमी अखेर खरी ठरली असून, ॲड. उदयदादा पाटील यांच्या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवनियुक्त चेअरमन ॲड. उदयदादा पाटील यांची भेट घेऊन ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप आणि ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीनेही ॲड. उदयदादा पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सहकार क्षेत्रातील त्यांच्या आगामी कार्यकाळात सातारा जिल्हा बँकेची अधिक प्रगती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.




