ताज्या बातम्या

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जि. प .आदर्श शाळा पोफळी होडेवाडी शाळेत ऐतिहासिक माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई ( शांताराम गुडेकर ) जिल्हा परिषद आदर्श शाळा पोफळी होडेवाडी शाळेला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत .या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शाळेत सर्व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दिनांक 14 नोव्हेंबर 2026 रोजी शासन परिपत्रका प्रमाणे माजी विद्यार्थी संघ व सर्व माजी विद्यार्थी ,शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्या शाळेने आपल्याला ज्ञान दिले ,संस्कार दिले आणि आयुष्याच्या पटलावरती यशस्वीपणे उभे केले त्या शाळेचा अमृत महोत्सवी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि ज्या गुरुजनांनी आपल्याला ज्ञानसागरातील दीपस्तंभ होऊन मार्गदर्शन केले त्यांना वंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर 21व्या शतकातील बदलत्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत राहून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या काही शैक्षणिक आणि भौतिक अत्यावश्यक गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे त्यामध्ये संगणक व इंग्रजी भाषा डिजिटल उपकरणे, इयत्ता चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षा संच, इयत्ता पहिली ते सातवी इंग्रजी शब्दकोश, ई लर्निंग स्मार्ट डिजिटल क्लासरूम, फाईव्ह स्टार स्मार्ट डिजिटल अंगणवाडी, तसेच टेबल, खुर्च्या विद्यार्थी बेंच, सिलिंग फॅन, वायफाय कनेक्शन, शाळेच्या अंगणात पेव्हर ब्लॉक बसवणे, शाळेचे प्रवेशद्वार आणि उर्वरित कंपाउंड वॉल ,वर्ग खोल्यांना सिलिंग करणे, या गरजांची परिपूर्ती या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते त्यासाठी माजी विद्यार्थी संघ व माजी विद्यार्थी यांच्या वतीने उद्देशिका तयार करण्यात आली होती.या मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा ,सांगली ,कोल्हापूर व राज्याच्या इतर भागातून माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित झाले होते तसेच या मेळाव्यासाठी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य ,शिक्षण विभागातील अधिकारी ,महाजनको पोफळी अधिकारी,दातृतुल्य देणगीदार, प्रमुख पाहुणे, विशेष मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सकाळी ठीक नऊ वाजता माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला सुरुवात झाली सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान शाळेमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून शाळेच्या प्रवेशद्वात स्वागत केले सर्व सदस्यांनी आपापली सदस्य नोंदणी शाळेच्या सदस्य नोंदणी वहीमध्ये केली तदनंतर सर्वांना नाश्ता आणि चहा देऊन सर्वांचा पाहुणचार केला प्रत्यक्ष साडेदहा वाजता माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला सुरुवात झाली उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद विद्यमान सदस्या सौ. नेहा रहाटे मॅडम , शाळेचे माजी विद्यार्थी विद्यमान जि प सदस्य श्री कदम साहेब , माजी पंचायत समिती सदस्य श्री विश्वनाथ (बाबुशेठ )साळवी , पंचायत समिती शिक्षण विभाग शिरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गर्जे साहेब, उद्योगपती श्री गणेश कांबळे, महाजनको उप मुख्यभियंता श्री .चव्हाण साहेब, उपकार्यकारी अभियंता श्री .जयवर्धन सूर्यवंशी साहेब, माजी केंद्रप्रमुख श्री लांडे साहेब, माजी विद्यार्थिनी सिनेअभिनेत्री (अनुकमल) सौ. अनुराधा जोगळेकर, शाळेचे माजी शिक्षक श्री. शिरगावकर गुरुजी सौ. साडविलकर मॅडम श्री .चांदणे गुरुजी, श्री पिरदनकर गुरुजी, भाभा अनुसंशोधन केंद्रातील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ श्री वसंत सुतार साहेब, ज्येष्ठ माजी विद्यार्थी, ज्येष्ठ माजी शिक्षक, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. महादेव चव्हाण ,उपाध्यक्ष श्री .विश्वनाथ (संभाजी) मानकर , स्वागत समितीचे प्रमुख श्री श्रीराम पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .नामदेव पानगले, ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्री . सुभाष (आप्पासाहेब) इंदुलकर श्री. चिमाजी पवार श्री. सुरेश रोखडे उत्कृष्ट निवेदक माजी विद्यार्थी श्री. राजेंद्र लोहार सर , ग्रामपंचायत सदस्य सौ सकपाळ मॅडम, श्री संजय बामणे शेठ सौ. घाणेकर मॅडम श्रीमती तेजस्वी मानकर , माजी विद्यार्थी संघ सदस्य सौ .संगीता शिर्के ,सौ .संगीता सुवार, श्री चंद्रकांत इंदुलकर श्री सुरेश शिगवण श्री हरिश्चंद्र फुटक देणगीदार श्री प्रकाश रघुनाथ पवार, निवास व्यवस्था समिती प्रमुख श्री दीपक रजोलिया व श्री दिलीप जाधव, आरोग्य अधिकारी अंकिता पाटील, श्री दर्शन कांगणे श्री विजय बोधे ज्येष्ठ माजी विद्यार्थी ,माजी शिक्षक, शाळेतील ,विद्यार्थी पालक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते या मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . त्यानंतर एक सप्टेंबर 1947 ते आज पर्यंत स्वर्गीय झालेल्या सर्व गुरुजनांना आणि माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कलाक्षेत्रातील गुणवंत व्यक्तिमत्व श्री. श्रीराम पवार आणि त्यांच्या तत्कालीन वर्गमित्र व सर्व सहकारी यांनी उत्कृष्ट प्रकारे सुमधुर आवाजात ईशस्तवन सादर करून सरस्वतीला वंदन केले,स्वरचित स्वागत गीतातून सर्व मान्यवर आणि माजी विद्यार्थी यांचे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत केले तर नंतर माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध नियोजन समितीचे प्रमुख यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचे, पाच हजार रुपये च्या पुढील सर्व देणगीदारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत आणि सत्कार केले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री मदने सर यांनी आपल्या प्रास्ताविका मधून शाळेचे आश्रय दाते कै. दाजीराम मानकर माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री विश्वनाथ मानकर आणि परिवार व महाजनको कंपनी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पालक, ग्रामस्थ, सर्व माजी विद्यार्थी , माजी विद्यार्थी संघ ,ग्रामपंचायत ,शिक्षक, दातृतुल्य देणगीदार यांच्या अथक परिश्रमातून आणि बहुमूल्य योगदानातून शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या विविध सहशालेय उपक्रम ,नाविन्य पूर्ण उपक्रम यांची माहिती दिली तसेच शाळेने प्रशासकीय, बौद्धिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात यशाने लिहिलेला गौरवशाली इतिहास सांगितला त्याचबरोबर शासन परिपत्रकाप्रमाणे हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा घेण्या पाठीमागचा उद्देशही विशद केला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा यासाठी तयार केलेल्या उद्देशिकेमध्ये शाळेच्या वर्तमानकालीन प्रगती बरोबर भविष्यातील सर्वोच्च प्रगतीसाठी काही बौद्धिक व भौतिक शैक्षणिक गरजांच्या परिपूर्तीसाठी माजी विद्यार्थी म्हणून आपल्या योगदानातून 21व्या शतकातील जगाशी स्पर्धा करणारा सर्वोत्तम विद्यार्थी आपल्या शाळेत घडावा यासाठी उद्देशिकेतील प्रत्येक बाबीचे महत्त्व सर्व माजी विद्यार्थी यांना सांगितले तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळा पोफळी होडेवाडी शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्याचा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय पोफळी ग्रामपंचायत ने घेतला आहे त्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभारही मानले तसेच खाजगी शाळांसारखा ड्रेस कोड आपल्या जिल्हा परिषद शाळेतही असावा या उद्देशाने ग्रामपंचायत च्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस देऊ केल्याचेही सांगितले आणि उद्देशिकेतील गरजांच्या परिपूर्तीसाठी सर्व माजी विद्यार्थी मान्यवर यांना नम्र विनंती आणि आवाहन सुद्धा केले त्यानंतर सर्व मान्यवरांची मनोगत झाली त्यामध्ये मान्यवरांनी आपल्या मनोगत मधून आपल्या शाळेच्या शैक्षणिक व भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपापले योगदान देऊ असे सर्व माजी विद्यार्थ्यांना आश्वासित केले माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ( संभाजी) मानकर यांनी सुद्धा शाळेमध्ये विविध क्षेत्रातील होत असलेली प्रगती माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत मिळत असलेले योगदान आणि वर्तमानकालीन प्रगती बरोबर भविष्यातील गरजा परिपूर्ण शाळेची पट संख्येतील वाढ होण्यासाठी भाविक आव्हान सुद्धा सर्व माजी विद्यार्थी ,पालक, आणि ग्रामस्थ यांना आपल्या मनोगतामधून केले. तसेच पंचायत समिती माजी सदस्य श्री विश्वनाथ (बाबू) साळवी यांनी आजपर्यंत शाळेला जसे सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे तसे भविष्यात देखील लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य करून असे सर्व माजी विद्यार्थ्यांना आश्वासित केले तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ. नेहा रहाटे आणि माजी विद्यार्थी व विद्यमान जि .प. सदस्य श्री. कदम सर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढी जास्त मदत करता येईल तेवढ्या प्रकारची करून शाळेच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे सर्व माजी विद्यार्थ्यांना सांगितले भाभा अनु संशोधन केंद्राचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ श्री .वसंत सुतार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या भविष्यकालीन गरजांसाठी रक्कम रुपये 50 हजार देणगी जाहीर केली तसेच अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शाळा सजावट व रंग रंगोटी शाळेच्या दर्शनी भागावरील संरक्षक भिंतीवर सुंदर असे पेंटिंग माजी विद्यार्थी श्री. श्रीराम पवार व सर्व सहकारी वर्गमित्र यांनी केले व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दुपारच्या स्नेहभजनासाठी विशेष परिश्रम घेतलेले माजी विद्यार्थी श्री बाळू शेख व सहकारी वर्गमित्र विशेष देणगीदार श्री. बाळू शेख, श्री .विश्वनाथ साळवी श्री .गणेश कांबळे, महाजनको ग्राहक भांडार अध्यक्ष गॅस वितरण कंपनी ,श्री कोंडू विठू खरात,श्री अजय जोगळेकर,श्री चंद्रकांत सुवार, वर्ग मैत्री प्रतिष्ठान एन इ एस पी 1991 बॅच, श्री .अंकुश देसाई, श्री वसंत कदम यांच्या सहकार्यातून श्रीमती शैला कदम (सौ शैला खेतले), श्री शिवाजी ( भाई) पवार ,श्रीमती जयश्री मानकर (श्रद्धा शांताराम सावंत), श्री सचिन जाधव ,श्रीमती सुचिता महादेव चव्हाण (सौ सुचिता तुषार पवार) श्री भिमराव बामणे ,श्री सतीश पोतदार, श्री अरुण मानोरकर,सौ अनुराधा जोगळेकर , श्री प्रकाश रघुनाथ पवार तसेच सर्व इतर देणगीदार यांच्या देणगीतून शाळेच्या काही शैक्षणिक व भौतिक गरजांची परिपूर्ती झाली आहे म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. महादेव चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेची प्रगती, शाळेमध्ये आवश्यक असलेल्या गरजा आणि शाळेतील पट संख्या वाढवण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न आणि त्याला आर्थिक योगदानातून आपण सर्वांनी साथ द्या अशा पद्धतीचे भावनिक आवाहन केलेसर्व मान्यवरांच्या मनोगतनंतर माजी विद्यार्थी संघ आणि माजी विद्यार्थी यांच्या वतीने सर्व मान्यवर आणि माजी विद्यार्थी यांना स्नेहभोजनाचे आयोजन केले होते स्नेहभजनानंतर दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील उल्लेखनीय यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले निमंत्रण पत्रिकेप्रमाणे 21व्या शतकात बदलत्या शिक्षण प्रवाहात माझी शाळा टिकवण्यासाठी माजी विद्यार्थी म्हणून माझे योगदान या विषयावरती माजी विद्यार्थी उत्कृष्ट निवेदक श्री राजेंद्र लोहार सर यांनी. चर्चासत्र चालवले त्या चर्चासत्रामध्ये व्यासपीठावरील मान्यवर माजी विद्यार्थी यांच्यामध्ये चर्चा होऊन ज्या शाळेने आम्हा सर्वांना अक्षरज्ञान दिले ,संस्कार दिले आणि आमचे आयुष्य उभे केले ती संस्काराची ज्ञानगंगोत्री असलेली शाळा टिकवण्यासाठी पट वाढवण्यासाठी विविध उपाय योजना सुचवल्या व त्या उपाययोजनांची परिपूर्ती होण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे योगदान मिळावे म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे सांगितले शाळेच्या प्रगतीसाठी पोफळी गावातील पालक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आणि या सर्व बाबी सोबत घेऊन शाळेच्या प्रगतीसाठी विशेष परिश्रम घेत असलेल्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा केले त्यामध्ये श्री. उदय भोसले, श्रीमती राणी लोहार सौ सुचिता तुषार पवार सौ .अनुराधा जोगळेकर श्री वसंत कदम, श्री. विश्वनाथ (बाबू )साळवी, श्री संजय बामणे, उपाध्यक्ष श्री विश्वनाथ (संभाजी) मानकर अध्यक्ष श्री. महादेव चव्हाण ,श्री. राजेंद्र लोहार सर मुख्याध्यापक श्री .मदने सर ,श्री रहाटे सर ,श्रीमती गिरी गोसावी मॅडम यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना 21 व्या शतकात शालेय विद्यार्थ्यांच्या गरजा त्यांच्या डोळ्यात असलेल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितले आणि निवेदक श्री राजेंद्र लोहार यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे चर्चासत्र घडवून आणले त्यानंतर उर्वरित सर्व मान्यवर देणगीदार यांच्या विशेष उपस्थिती यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यानंतर माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री महादेव चव्हाण यांनी सर्व प्रमुख मान्यवर विशेष उपस्थिती प्रशासकीय अधिकारी राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माजी विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य , रक्कम रुपये 5000 पण त्या पुढील आर्थिक योगदान देणारे व व वस्तुरूप विशेष देणगीदार, आणि हा स्नेह मेळावा अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पाडण्यासाठी आणि त्याची उंची वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या सर्व नियोजन समितीचे प्रमुख व सदस्य माजी विद्यार्थी संघ सदस्य सर्व माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ ग्रामपंचायत व शाळेतील विद्यार्थी या सर्वांचेच आभार व्यक्त केले शेवटी माजी विद्यार्थी उत्कृष्ट गायक श्री श्रीराम पवार आणि सर्व सहकारी वाद्यवृंद टीम यांनी राज्य गीत आणि वंदे मातरम यांचे गायन केले आणि सर्वांना पुढील उत्तम आरोग्य उदंड आयुष्य आणि शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यासाठी या यासाठी शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा यशस्वी आणि ऐतिहासिक करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी ,सर्व नियोजन समित्यांचे प्रमुख व सर्व सदस्य , विशेष देणगीदार ग्रामस्थ पालक ग्रामपंचायत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी या सर्वांच्या प्रति माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.*

Scroll to Top