पाचगणी : पत्रकरिता क्षेत्रांमध्ये तत्वनिष्ठ विचारधारा जिवंत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार रविकांत बेलोशे यांचा पाचगणी सत्कार करण्यात आला. सामान्य माणसांना प्रसार माध्यमाद्वारे विश्वास संपादन करणारे पाचगणीचे पत्रकार रविकांत दिनकर बेलोशे यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्याचाच गौरव झाला आहे. राष्ट्र भूषण, न्यूज ग्रेड पीपल फाउंडेशन विजेता मीडिया आणि फॉर्च्यून मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा पुणे येथील वि. का. राजवाडे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या वेळेला डॉ. महेश थोरवे, गोपाळ खंडोर तसेच भारती तुपे, प्रियंका आबनावे, वल्लभ बोथरे, आणि राजेंद्र पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जावळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार तसेच साप्ताहिक संपादक मीडियाचे राज्य अध्यक्ष संजय कदम, दैनिक सकाळचे प्रतिनिधी भाऊसाहेब जंगम तसेच पाचगणी येथील यशस्वी हॉटेल उद्योजक तथा हॉटेल कायझेन, दांडेघर ,राजेंद्र कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांचा आदर्श घेऊन पत्रकार रविकांत बेलोशे हे पत्रकरिता करतात. आणि योगायोग म्हणजे राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या दिवशीच ह .भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या नातवंडांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार होत आहे .ही फार भाग्याची गोष्ट आहे. एक आदर्श पत्रकारिता करून श्री रविकांत बेलोशे यांनी धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पाचगणी महाबळेश्वर चे पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात भरीव व सकारात्मक बातमीदारी केली आहे. आजच्या घडीला त्यांच्या बातमीमुळे खऱ्या अर्थाने अधिकारी वर्गांना सुद्धा चांगल्या योजना राबवल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. पत्रकार बेलोशी यांना कुंडी व रोप देऊन सत्कार करून त्याची पत्रकारिता वटवृक्षासारखी भरून यावी अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी पाचगणी परिसरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ………………………… फोटो पाचगणी येथील प्रसिद्ध हॉटेल कायझेन , दांडेघर येथील पत्रकार बेलोशे यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप पाचगणी)




