मुंबई(शांत्ताराम गुडेकर) : शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्याय – हक्कासाठी सतत कार्यरत असलेले श्री. किरण पावसकर (मा.आमदार, शिवसेना सचिव, शिवसेन प्रवक्ते,अध्यक्ष -राष्ट्रीय कर्मचारी सेना) यांचा नुकताच अंधेरी पूर्व येथील शेर ए पंजाब जिमखाना सभागृह येथील वर्ल्ड रेकॉर्ड – लंडन लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन, युनायटेड किंगडम तर्फे ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’हा ‘कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान’ (Outstanding Contribution to the Labour Sector) या श्रेणीमधील सन्मान करण्यात आला.कामगारांच्या कल्याणासाठी दिलेले उल्लेखनीय योगदान, कामगार चळवळीतील खंबीर नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे हक्क व हितसंबंध जपण्यासाठी केलेले समर्पित प्रयत्न, याबद्दल हा सन्मान दिला जात आहे
श्री. किरण पावसकर (मा.आमदार, शिवसेना सचिव, शिवसेना प्रवक्ते,अध्यक्ष -राष्ट्रीय कर्मचारी सेना) यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रीय कर्मचारी सेना पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.




