ताज्या बातम्या

एचडीआयएल प्रिमिअर वसाहतीतील विकासकामांचा आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते शुभारंभ इमारत क्रमांक ४ चे नूतनीकरण, रस्ते व गटारांच्या कामांना सुरुवात

मुंबई(शांताराम गुडेकर ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांदिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विभागप्रमुख दिलीप (मामा) लांडे यांच्या प्रयत्नांतून कुर्ला येथील एचडीआयएल संकुलातील प्रिमिअर वसाहतीत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते इमारत क्रमांक ४ च्या नूतनीकरणासह परिसरातील विविध नागरी सुविधांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. तसेच परिसरातील रस्ते आणि गटारांच्या नूतनीकरणाच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली. या विकासकामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन रहिवाशांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सुख-सुविधांना प्राधान्य देऊन परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार दिलीप लांडे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक रहिवासी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top