ताज्या बातम्या

आजी-माजी शिक्षक आमदारांच्या लढतीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष…

कोल्हापूर(अजित जगताप) : पुणे विभाग शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या दुरंगी लढतीमध्ये सध्या अनुभव असलेले विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. या प्रतिष्ठित लढतीकडे निष्ठावंत शिक्षकांचे पश्चिम महाराष्ट्रात लक्ष लागले आहे. सातारा- सांगली- पुणे- कोल्हापूर व सोलापूर अशा पाच जिल्ह्यांमध्ये ६२ हजार शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात या दोन्ही मातब्बर आजी-माजी आमदारांना समाज माध्यमावर केलेल्या कार्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज निर्माण झालेली नाही. दोन तगडे उमेदवार शिक्षक मतदारांच्या चांगले परिचित आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात या दोन्ही शिक्षकांनी प्रतिनिधित्व करताना शिक्षकांच्या मूलभूत मागण्या शासन दरबारी मंजूर करून शिक्षण क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे याबाबत विधिमंडळाच्या कामकाजातील त्याची नोंद आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारणा करण्यासाठी दोन्ही आजी-माजी आमदारांनी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये तिसरा पर्याय होऊ शकलेला नाही. हे त्रिवार सत्य समोर आलेले आहे.
राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्यानंतर राजकारणी मंडळी शिक्षकांचा चांगल्या पद्धतीने वापर करतात. परंतु या दोन आजी-माज आमदारांनी शिक्षकांचे अस्तित्व कायम राखण्याचे प्रयत्न केले आहेत. थेट शिक्षक मतदारांशी गाठीभेटी व संवाद असल्याने त्यांना फक्त उजळणी करायची आहे. या व्यतिरिक्त इतरांना आरोपांना उत्तर द्यावी लागत असून त्यांची चांगलीच कोंडी होत आहे.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश याचा आदर भाव सर्व शिक्षकांबद्दल आहे. शहरी भागातील शिक्षकांना फारसं राजकारणाचे देणे घेणे नसते परंतु ग्रामीण भागात काम करत असताना राजकीय हस्तक्षेपला सामोरे जाऊन अनेकांना काम करावे लागते. अशा वेळेला गुणवत्ता असणारे व नैतिक कर्तव्य पार पाडणाऱ्या आजी-माजी आमदारांबद्दल आदरयुक्त भाव व्यक्त केले जात आहेत. माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत व विद्यमान आमदार जयंत तासगावकर यांनी ८० टक्के व्यक्तिगत पातळीवर हस्ते पर हस्ते शिक्षकांशी संपर्क आहे. शिक्षकांपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून आपली प्रामाणिक भूमिका पोहोचवली आहे. समाज माध्यम असो किंवा प्रसारमाध्यम पासून अलिप्त राहून त्यांनी मतदारांपर्यंत जाणे पसंत केले आहे. अनेक ठिकाणी शिक्षक मतदार या दोन उमेदवारांचा उल्लेख करून आपल्यापर्यंत वचननामा जाहीरनामा पोचल्याचे मान्य करत आहेत.

माजी आमदार सावंत यांनी जुलै २०१४ मध्ये विधानपरिषदेत गेले होते आणि तालिका सभापती म्हणूनही काम केले. २०२६ च्या निवडणुकीसाठी त्यांना अनुक्रमांक ५ समोर पसंती क्रमांक १ करण्याचे आवाहन त्यांना मानणाऱ्या शिक्षक मतदार व समर्थकांकडून केले जात आहे. गेल्या २५-२६ वर्षांपासून शिक्षक चळवळीत कार्यरत आहेत. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सातत्याने आक्रमक भूमिका मांडली आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, विनाअनुदानित व अल्प-अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि थकीत वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
अशैक्षणिक कामांपासून मुक्ती, टी इ टी परीक्षक सक्तीला विरोध, क्रीडा गुण मुदतवाढ यांसारख्या मुद्द्यांवर आझाद मैदानावर उपोषण व विविध आंदोलने केली आहेत.
• सोलापूर जिल्ह्यातील बाळे येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठीही त्यांनी पाठपुरावा केला . विद्यमान पुणे विभागातील शिक्षक आमदार जयंत दिनकर आसगावकर यांनी सुद्धा प्रचारामध्ये संयमता व टीकाटिपणी टाळून शिक्षकांचे प्रश्न जे बाकी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच उमेदवारी असल्याचे मान्य केले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विभागातील सर्व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले नेते म्हणून शिक्षक मतदार त्यांना ओळखत आहेत. ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. या दुरंगी लढतीमुळे खऱ्या अर्थाने पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील इतर उमेदवारांना प्रचारामध्ये असलेल्या त्रुटी व राजकीय मंडळीचा हस्तक्षेप सहन करावा लागत असल्याने त्यांच्या प्रचाराचे गणित बिघडल्याची चर्चा सुरू झालेली आहे. एक मत त्यांना.. एक मत मला असा आता प्रचार होऊ लागलेला आहे. याचाही फटका यानिमित्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
———————————————-
फोटो- पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील आजी-माजी आमदार

Scroll to Top