सातारा

(अजित जगताप ) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाने पावन झालेल्या सातारा भूमीत भाजप तथा महायुतीच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. डॉ. जाधव यांच्या प्रचार निमित्त झालेल्या भेटीने भाजप सह महायुतीमध्ये गेली आठवडाभर प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे निर्वीवाद प्राबल्य आहे. अनेक कार्यकर्ते मनापासून प्रचार यंत्रणेत झटत आहेत. प्रत्येकाने दिलेल्या जबाबदारीनुसार पुणे विभाग पदवीधर मतदार संघामध्ये बारीक सूक्ष्म नियोजनाप्रमाणे आढावा सुद्धा घेतला जात आहे. प्रत्येक पदवीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन ते चार पद्धतीने वरिष्ठ नेते गण व कार्यकर्ते स्वतःहून लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी मजबूत व विश्वासूफळी कार्यरत झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये प्रत्येक गाव व खेड्यापाड्यांमध्ये भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. महाविद्यालयांमध्ये जाऊन पदवीधर व द्वि पदवीधर यांना भाजप पक्षाची व उमेदवार डॉ. जाधव यांची भूमिका पटली आहे. पदवीधर मतदारांनी मतदान केंद्रात जाऊन पहिल्या पसंतीचे एक नंबर एवढाच फक्त मतपत्रिकेवर नोंद करून डॉक्टर स्मिता योगेश जाधव यांना निवडून देण्याची जबाबदारी पूर्ण करायचे आहे. असा विश्वास महिला आघाडीच्या सुनिशा शहा यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. जाधव यांच्या सातारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यानिमित्त सातारा शहर व परिसरातील मान्यवर नेतेगण व पदवीधर मतदारांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यात पदवीधर व विद्याविभूषित अशा भाजपा पदाधिकारी तेजस्विनी घोरपडे व पायल जाधव, गीता लोखंडे, रीना भणगे, वैशाली टंकसाळे, प्रवीण शहाणे, विकास गोसावी, अविनाश खर्शिकर, अमोल कांबळे, विक्रांत भोसले, विक्रम बोराटे, राहुल शिवनामे, नितीन कदम, विठ्ठल बलशेठवार, चिन्मय कुलकर्णी, शेखर पाटोळे, विजय नाईक, प्रदीप शेटे, रवींद्र लाहोटी, मनीष महाडवाले यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झालेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सागर शिवदास, राजू भैय्या भोसले, चारुशीला पवार, संजय निकम यांनी पदवीधरांच्या व्यक्तिगत गाठीभेटीलाही चांगलीच सुरुवात केली असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. जावळी तालुक्यामध्ये सुद्धा पदवीधरांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त मताधिक्य भाजप उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना मिळावे. यासाठी जागोजागी सक्षमरित्या प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे, अंकुशराव शिवणकर, श्रीधर शिंदे, ज्ञानेश्वर रांजणे, संदीप परामणे, दत्तात्रय भालेघरे -पवार, इंद्रजीत भिलारे, सुरेश मोरे, श्रीहरी गोळे, जितेंद्र शिंदे, शिवाजीराव गोरे, मालोजीराजे शिंदे, सयाजी शिंदे, प्रवीण देशमाने, चारुशीला पवार, संजय निकम, रवींद्र परामणे, मुरलीधर पाटील, अभिजीत दुदुस्कर, राहुल माने, सोन्या पवार यांच्यासह भाजपचे अनेक जण जावळी तालुक्यातील पदवीधरांच्या संपर्कात आहेत .
भविष्यातील पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कशा पद्धतीने महायुती सत्तेचा वापर केला जाईल? याचे विश्लेषण करीत आहेत. एकूणच या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्याला दमदार प्रतिसाद मिळत असल्याने निकालाची उत्सुकता लागली आहे. …………………………………
पुणे विभाग पदवीधर उमेदवार डॉक्टर स्मिता जाधव यांचे स्वागत करताना (छाया- अजित जगताप सातारा)




