ताज्या बातम्या

उरणमध्ये शिवसेना शहर नवरात्रोत्सव मंडळाचा नवरात्र उत्सव थाटात; चारफाटा येथे भाविकांची मांदियाळी

उरण, रायगड : उरण शहरातील चारफाटा येथे शिवसेना उरण शहर नवरात्र उत्सव मंडळातर्फे प्रथमच नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उरण शहराचे लोकप्रिय अध्यक्ष सुलेमान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाचे अध्यक्ष सुनील भोईर (अण्णा) आणि आयोजकांच्या पुढाकाराने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनेश पाटील आणि समत भोंगले यांनी आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. हंसराज चव्हाण, शैलेश जोशी, दर्शन जळगावकर, भारत माळी, विरू चाळके यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देवीच्या आगमनासाठी विशेष परिश्रम घेतले.
नवदुर्गेच्या सुंदर व आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस भक्तिभावाने पूजा-अर्चा आणि प्रार्थना केली जात आहे. तसेच दांडिया व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवाला हजारो दांडियारसिकांची उपस्थिती लाभत आहे.
स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, पत्रकार, डॉक्टर, वकील, ज्येष्ठ समाजसेवक आणि महिला मंडळे उत्सवाला भेट देत आहेत. नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी व व्यापारी बांधवांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top