मुंबई : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ आणि शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे भव्य राष्ट्रीय अधिवेशन, प्रशिक्षण शिबिर व चर्मकार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
साई पालखी निवारा, निघोज, निमगाव, शिर्डी, जि. अहिल्यानगर येथे होणाऱ्या या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान माजी समाजकल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष, चर्मकार हृदयसम्राट बबनराव (नाना) घोलप भूषविणार आहेत.
या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनाच्या माध्यमातून चर्मकार समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी, उद्योजक, अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व संघटनात्मक प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन करण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय अधिवेशन व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम पांडुरंग कारंडे यांनी केले आहे.




