मुंबई (शांताराम गुडेकर ) : आज शनिवार २१नोव्हेबर२०२६ रोजी मुंबईतील हुतात्मा स्मारक या प्रेरणास्थानास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,मुंबई जिल्हाधिकारी,मुंबईचे पोलीस आयुक्त,सामाजिक
कार्यकर्ते,संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष
भाऊ सावंत यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.भाऊ सावंत यांच्या अथक प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे आजचा “महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन ” २१ नोव्हेंबर २००० सालापासून शासकीय
इतमामात पाळण्यात येतो.




