ताज्या बातम्या

अजितदादांच्या मृत्यूची चौकशी सरकारनेच केली पाहिजे – पद्मश्री लक्ष्मण माने

सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्रांचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. हा अपघात की घातपात होता? हा जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे. महाराष्ट्रांचा हा होतकरु तरुण नेता अचानकपणे अपघातामध्ये निधन पावतो. ही वेदनादायक व दुःखद घटना महाराष्ट्रातील जनता विसरायला तयार नाही. अजित दादाच्या मृत्यूची चौकशी सरकारने केली पाहिजे होती. असे स्पष्ट मत पद्मश्री लक्ष्मण माने यांनी साताऱ्याचे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार यांचे सख्खे पुतणे आ.रोहितदादा पवार भारत व महाराष्ट्र सरकारकडे या अपघाताची चौकशी व्हावी. यासाठी प्रयत्न करीत आहेत. ते एकटेच लढत आहेत हे इतरांसाठी ही शरमेची बाब आहे .
महाराष्ट्रामध्ये या संबधीचा गुन्हा (एफ. आय. आर.) कोणत्याही पोलिस स्टेशनने दाखल करुन घेतला नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवले जाते. सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्याच्या अपघाती निधनांची चौकशी खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने स्वत:हून तात्काळ करणे गरजेचे
होते. परंतू, तसे झाले नाही.आ.रोहितदादा पवार यांनी यासंदर्भात आतापर्यंत सहा पत्रकार परिषदा केल्या, घटनेला नऊ महिने
होवून गेले, घटनेचा एफ. आय. आर. महाराष्ट्र ऐवजी कर्नाटकात जावून करावा लागला, यावरुन या घटनेमध्ये काहीतरी काळेबेरे व
लपवाछपवी आहे, कुणाला तरी पाठीशी घालायचे आहे, असे स्पष्टपणे दिसते. असही आरोप माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केला आहे.
राज्यसरकार स्वत:च्या
उपमुख्यमंत्रयाच्या अपघाताची चौकशी करु शकत नसेल तर सर्वसामान्यांचे काय? यासाठी आ.रोहितदादा पवार यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतंय. या त्यांच्या सर्व आंदोलनाच्या पाठीशी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे कार्यकर्ते क्रियाशीलपणे सामिल होतील व जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आ.रोहितदाद पवारांच्या पाठीशी संघटना सर्व ताकदीनिशी उभी राहील.आ.रोहितदादा पवार जी राजकीय भूमिका घेत आहेत. त्या भूमिकेचे पद्मश्री माने यांनी व त्यांच्या संघटनेने स्वागत केले आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रतिगामी शक्तींचे बळ वाढणार नाही. यासाठी आदरणीय खा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. असे त्यांनी शेवटी सांगितले या वेळेला प्रकार परिषदेत पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासोबत संघटनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष दिलीप कुमार जाधव उपस्थित होते.

Scroll to Top