मुंबई : लोकमान्यनगर प्रियदर्शिनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या दोन्ही इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या विकासकामाचा शुभारंभ रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला.
संस्थेच्या इमारत क्र. १ आणि इमारत क्र. २ येथे सोलर पॅनल बसविण्याचे काम सदर काम विश्वविक्रमी आमदार कालिदास कोळंबकर यांच्या आमदार निधीतून करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे संस्थेतील रहिवाशांना सौरऊर्जेचा लाभ मिळण्यास मदत होणार असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
‘सौर ऊर्जा, सुरक्षित भविष्य’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या विकासकामाबद्दल संस्थेतील सभासद व रहिवाशांनी आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
सदर कामाला विकास निधी दिल्याबद्दल विश्वविक्रमी आमदार कालिदास कोळंबकर यांचे सर्व सोसायटीच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले.




