ताज्या बातम्या

“झेप युवा करिअर महोत्सव श्री चोरगे यांच्या व्यक्तिगत मार्गदर्शनाने युवा पिढी भारावली…

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध संधींची माहिती उपलब्ध करण्यासाठी रविवार दिनांक ४ ऑक्टोबर कर्मवीर भाऊराव पाटील अभियंता महाविद्यालय, सदर बाजार, सातारा या ठिकाणी झेप युवा करिअर महोत्सव २०२६ यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक तसेच श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे श्री राजेंद्र चोरगे यांची साताऱ्यातील युवकांनी भेट घेतली. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे? असा प्रश्न केला. यावेळी श्री चोरगे यांच्या व्यक्तिगत मार्गदर्शनाने त्या ठिकाणी उपस्थित असलेले युवा पिढी भारावून गेली आहे. त्या अर्थाने हा झेप महोत्सव यशस्वी ठरला आहे.
अँनिलि अकॅडमी सातारा आणि स्वयंसिद्ध महिला विकास संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. साताऱ्यातील होतकरू व गरजवंत युवकांसाठीच्या विशेष करिअर मार्गदर्शन लाभले. या महोत्सवात प्रसिद्ध अभिनेते व पुरोगामी विचारवंत किरण माने, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के, प्राध्यापक दशरथ बलटू सगरे , अभयसिंह जगताप, उज्वला फडतरे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे राजेंद्र चोरगे, गिरीश तांबे, निसार तांबोळी, प्रसाद संकपाळ, तेजपाल वाघ, सुभाष गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमानंतर काही युवकांनी जिज्ञासा पोटी श्री चोरगे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्षेत्रातील अनुभव आणि यशस्वी वाटचालीतून विद्यार्थ्यांना शिस्त, जिद्द, मेहनत, सातत्य आणि समाजाप्रती जबाबदारीचे महत्त्व पटवून देण्यात आले. श्री चोरगे यांनी कार्यक्रम झाल्यानंतर भेटीसाठी आलेले युवक अनिकेत मतकर, रोहित संतोष धुंदळे यांनी श्री चोरगे यांच्याशी विविध विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधला.
साताऱ्यात श्री छत्रपती शाहू स्टेडियम, श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून क्षेत्र माऊली येथील श्री कैलास स्मशानभूमी, गुरुकुल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक पिढी घडवण्याचे काम करत आहेत. सामाजिक प्रश्न सरकारी दरबारी मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. विविध धार्मिक उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या शासकीय कर्मचारी पोलीस यंत्रणेला नाष्टा- जेवण यांची मोफत व्यवस्था करतात. या कार्याला भारावून अनेक युवकांनी प्रेरणा घेतली आहे. यावेळी समिंद्रा जाधव, वैशाली जाधव, रितू शिंदे, साळुंखे ,गौरी आवळे, श्री पाटील, श्री शेंडे, अजित जगताप, पवार वाडीचे श्री . घाडगे उपस्थित होते . त्यांनीही श्री चोरगे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. झेप युवा करिअर महोत्सवात संवाद कौशल्य विकासित, सरकारी स्टील पोर्टल, नोकरी व व्यवसाय गुंतवणूक व कर्ज, मद्रा योजना, सरकारी योजना, समाज माध्यम व मार्केटिंग याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण महाराष्ट्राचा विकास अवलंबून आहे. याची खात्री पटली.
या कार्यक्रमाच्या उद्घाघाटन प्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे ,खासदार नितीन पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

———————————————–
फोटो- झेप युवा करिअर महोत्सवाची तयारी करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)

Scroll to Top