ताज्या बातम्या

अंकुश महाराज कुमठेकर यांची ‘समाज रत्न पुरस्कार’ासाठी निवड

अंबरनाथ : ‘आदर्श रायगड’ वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य तसेच विविध प्रकारच्या समाजसेवेतून समाजजागृतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी . ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांची ‘समाज रत्न पुरस्कार’ या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व समाजप्रबोधनात्मक कार्याची दखल घेत ‘आदर्श रायगड’ वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल अंकुश महाराज कुमठेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याला मिळालेली ही दखल समाजसेवेसाठी निश्चितच प्रेरणादायी मानली जात आहे.
‘आदर्श रायगड’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता ब्राह्मणसभा मंगल कार्यालय, श्री दत्त मंदिर, वडवली विभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे होणार आहे.
या सोहळ्याला उपस्थित राहून अंकुश महाराज कुमठेकर यांच्या सन्मानाचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Scroll to Top