कराड(प्रताप भणगे) : लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘सह्याद्री नवदुर्गा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात विठ्ठलवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य अश्विनी महादेव चव्हाण यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
कराड पंचायत समितीचे सदस्य श्री. संग्राम (बाबा) पवार यांच्या आयोजनातून हा पुरस्कार वितरण सोहळा कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे उत्साहात पार पडला.
समाजातील सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सह्याद्री नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
अश्विनी चव्हाण या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असून, त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासह लोकहिताच्या कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला. या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना निश्चितच नवी ऊर्जा व प्रोत्साहन मिळणार आहे.




