प्रतिनिधी : बाळासाहेब कोकळे कोकण निसर्गसौंदर्य आणि जंगल यांचा वापर करून शूटिंग झालेला भयपट काल रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककथांचा वारसा जपलेले रज्जाक शेख यांची यात प्रमुख भूमिका असून त्यांनी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईच्या लय भारी प्रॉडक्शन प्रस्तुत भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ यात लेखिका व कथा सौ. प्रांजली काळबेंडे, दिग्दर्शक, निर्माता, संवादलेखन व पटकथा श्री. प्रमोद न. सूर्यवंशी, सहदिग्दर्शक श्री. संतोष रामचंद्र जाधव, सहनिर्माता श्री. हरिशचंद्र दळवी , मुख्य कलाकार श्री. रज्जाक शेख, सौ. स्मितादेशमुख, श्री. योगेश करणे, उपासना किरण, बालकलाकार कु. समीक्षा सागर नाईक, कु. आर्या शिव कोरे, सहकलाकार सौ. रेखा चंद्रकांत हरियाण, श्री. शिव कोरे, श्रीराम धने, सौ. वंदना नागम, श्री. संतोष जाधव, सौ. वसुधा नाईक, श्री. उल्हास किरण, कला दिग्दर्शक सौ. रेखा चंद्रकांत हिरण, श्री. प्रमोद पाताडे, सिनेमॅटोग्राफी निकिल हातणकर, श्री. योगेश करणे, मेकअप सौ. रेखा चंद्रकांत हिरण, कॉस्च्युम डिझाइन लय भारी टीमने केले असून लघुपटाला खूप प्रतिसाद मिळत आहे.
रज्जाक शेख यांच्या मते, ‘शापित ग्रंथ’ हा एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभव होता. ‘शापित ग्रंथ’ ही हॉरर शॉर्ट फिल्म रिलीज झाली आणि सर्वांच्या कामगिरीचा अभिमान वाटला. भीतीची अतिशय प्रभावी मांडणी, उत्कंठावर्धक प्रसंग आणि उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण यामुळे हा लघुपट मनाला भिडतो.
या भयपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत, आपलेपणा आणि समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगामागे अनेक तासांची मेहनत आणि जिद्द आहे, हे यातून जाणवते.
त्याचबरोबर या लघुपटासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, आपले घर उपलब्ध करून दिले आणि संपूर्ण टीमला मनापासून सहकार्य केले, त्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक.
‘शापित ग्रंथ’ हा केवळ एक हॉरर शॉर्ट फिल्म नसून, अनेकांच्या मेहनतीतून साकारलेला एक अविस्मरणीय अनुभव आहे.




