ताज्या बातम्या

कोकण सुपुत्र समीर वि.खाडिलकर ” महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड -२०२६” ने सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर ) : कोकण सुपुत्र सध्या मुंबई येथील बोरिवली पश्चिम येथील माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य, माहिती अधिकार,पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी मुंबई जिल्हा,पत्रकार,समाजसेवक डॉ.समीर खाडिलकर यांना त्यांच्या सोशल वर्क मधील उल्लेखनीय कार्याबद्दल ग्लोबल पीस कॉन्सिल, इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सतर्फे नवी दिल्ली येथे २ ऑक्टोबर २०२६ रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया,नवी दिल्ली(Constitution Club of India)येथे आचार्य लोकेशजी मुनी,अविनाश संकुडे यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी जयंतीनिमित्त ” महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड -२०२६”(Mahatma Gandhi Nobel National Award ) प्रदान करण्यात आला.
पत्रकार,समाजसेवक डॉ.समीर खाडिलकर यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून ते महाराष्ट्र मधील जेष्ठ नागरिक यांना मदतीचा हात देण्यात अग्रेसर आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता समीर खाडिलकरही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. यापुर्वीही माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य समाजसेवक समीर खाडिलकर यांनी
ठाणा जिल्ह्यातील दिवा परिसरातील दिवा गणेश नगर आणि बी.आर.आर नगर येथील गरजूंना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.तर ईशान्य मुंबईतील ३० जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना अन्नधान्य किटचे वाटप(वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले. नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो.आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत समाजसेवक समीर खाडिलकर कायमस्वरुपी बोलताना व्यक्त करतात.
यापुर्वीच त्याच्या सेवाभावी कार्याची दखल घेत खार पूर्व येथील “श्री स्वामी समर्थ ” कृपासिंधू सामाजिक संस्था(नोंदणीकृत)अध्यक्ष सुनिल मांजरेकर,सल्लागार रविंद्र आंब्रे यांनी समीर खाडिलकर यांचा “कोविड योध्दा” सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे.तसेच भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे(संपादक- शिववृत्त),महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड.आनंदजी गुगळे यांनी ” कोविड योध्दा” या सन्मानपत्राने गौरविले.तसेच साप्ता.धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,पाक्षिक आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांच्यासह विविध संस्था,संघटनाव वर्तमानपत्र यांनीही समीर खाडिलकर यांचा “कोविड योध्दा” सन्मानपत्रने गौरव केला आहे.समीर खाडिलकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक,ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Scroll to Top