ताज्या बातम्या

शिवसेना नेतृत्वाचा विश्वास सार्थ करण्यासाठी आनंदयात्री पर्यावरण सेनेचा जनसंपर्क दौरा

मुंबई : पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जनजागृती आणि पर्यावरण व्यवस्थापन या उद्देशाने शिवसेनेशी संलग्न ‘आनंदयात्री पर्यावरण सेना’ या विभागाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी तथा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. तानाजी घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर श्री. तानाजी घाग यांनी मुंबई, ठाणे तसेच एमएमआर परिसरात जनसंपर्काला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह शेकडो गणेशोत्सव मंडळे व गणेश मंडपांना भेटी देत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली. तसेच **‘आनंदयात्री पर्यावरण सेने’**च्या ध्येय-धोरणांची माहिती देऊन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत विविध मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
गणेशोत्सवानंतर मुंबई व ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा दौरा करण्याचा मानस श्री. घाग यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात स्थानिक शिवसेना नेते,

Scroll to Top