ताज्या बातम्या

दिवाळीनिमित्त शेकडो रिक्षाचालकांच्या उपस्थितीत आमले मोटर्सचा लकी ड्रॉ उत्साहात संपन्न

कोकण (शांताराम गुडेकर ) : दिवाळी सणाचे औचित्य साधून आमले मोटर्स आणि आपला इन्शुरन्स मित्र यांच्या वतीने रिक्षाचालकांसाठी आयोजित करण्यात आलेला रोख रकमेचा भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम शेकडो रिक्षाचालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मोटार इन्शुरन्स क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले आमले मोटर्सचे संचालक तथा आपला इन्शुरन्स मित्र डॉ. श्री. संतोष शिवदास आमले आणि खांदेश्वर रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या संयुक्त पुढाकारातून कामोठे, जुई, नौपाडा, धाकटा खांदा व मोठा खांदा परिसरातील रिक्षाचालकांसाठी या विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे लकी ड्रॉ कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. ज्योती देशमुख यांच्या हस्ते काढण्यात आले. या वेळी कळंबोली वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक किरण शिकलकर उपस्थित होते.यामध्ये प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपयांचे बक्षीस मंगेश सखाराम म्हात्रे (कामोठे), द्वितीय क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस पंढरी गजानन भगत (नौपाडा), तृतीय क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे बक्षीस नरेश गोमा पाटील (जुई) आणि चतुर्थ क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे बक्षीस जयदास चंद्रकांत गोधळी (मोठा खांदा) यांनी पटकावले.
या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका हेमलता रवींद्र गोवारी, नगरसेवक दिलीप बाळाराम पाटील, भाऊ भगत, सुनील गोवारी, रितिक्षा विनू गोवारी, मनिषा अनंता म्हात्रे, माजी नगरसेवक प्रमोद बुधाजी भगत, अनंता म्हात्रे, समाजसेवक सागर दिलीप पाटील, रामदास बुधाजी गोवारी, समाजसेविका प्राजक्ता संतोष गोवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजू म्हात्रे, सचिन गोवारी, किरण गोवारी, मंगेश मुंडकर, रुपेश चिमणे, विजय दुंद्रेकर, जगदीश क्षीरसागर, भाऊ म्हात्रे, बाळा झोडगे यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दैनिक युवक आधारचे सहसंपादक मुकुंद कांबळे तसेच आदर्श भारत माझाचे संपादक अण्णासाहेब आहेर यांचीही उपस्थिती होते.
रिक्षाचालक हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून, दिवाळीच्या आनंदात त्यांचाही सहभाग असावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी आमले मोटर्सच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Scroll to Top