वडूज(अजित जगताप) : माण- खटाव मतदारसंघामध्ये गुणवत्ता व राजकीय पाठ्यबळ यामुळे आमदारकीची हॅट्रिक झाली आहे. आता दोन वर्षांनी होणाऱ्या माण – खटाव विधानसभा मतदारसंघाची आतापासूनच बांधणी सुरू झालेली आहे. वडिलांचे आमदारकीचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्तबगार लेक सध्या विधान परिषदेच्या यशानंतर महाराष्ट्र विधानसभा सदस्य बनवण्यासाठी तयारीला लागली आहे. त्यांना अनेकांचे आशीर्वाद लाभले आहेत.
माण – खटाव तालुक्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केले. यापूर्वी माण – खटाव तालुक्यातील जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रभाकर घार्गे (पळशी) , भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार धैर्यशील कदम,( पुसेसावळी) यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार हर्षदा प्रभाकर देशमुख- जाधव (लोधावडे) यांच्या गळ्यामध्ये विधान परिषदेची आमदारकी लाभली आहे. तर युवा नेते शेखर गोरे, अभयसिंह जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
दुष्काळ निवारणाबाबत काहींनी फक्त जाहिरातबाजी केली. तरीही निपक्षपातीपणाने वास्तवता पाहिली तर आजही या मतदारसंघात वाड्या वस्तीमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुष्काळनायक पाठीशी उभा असल्याने अनेकांची भ्रष्टाचारातून तहान भागत असल्याने दुष्काळी जनता कंटाळली आहे. जलदायक अच्छे दिन अध्याप आले नाहीत. अशा बिकट परिस्थितीमध्ये काळी जनतेला बऱ्याच दिवसानंतर एक चांगला पर्याय मिळालेला आहे. हा पर्याय स्वीकारण्यासाठी आता स्वयंपूर्ण बांधणी सुरू झालेली आहे.
सन २०२९ साली होणाऱ्या माण – खटाव विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तनाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. अशी राजकीय परिस्थिती सध्या दिसून येत आहे. एक वेळ सर्वांना फसवता येते. पण, सर्व वेळ सर्वांनाच फसवता येत नाही. नैसर्गिक गुणधर्म आहे. तो या मतदारसंघात लागू होणार आहे.
तरुण पिढीला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तसेच वडीलधारी मंडळींना काळजी घेणारी लेक , सुन लाभली आहे. आमदार हर्षदा देशमुख-जाधव या पुणे पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण आमदार आहेत. भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्रात लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार – महाविकास आघाडी) पक्षामार्फत
पुणे पदवीधर मतदारसंघ (विधान परिषद ) आमदार म्हणून त्यांनी यशस्वी सुरुवात केली आहे.त्या माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. कडक शिस्तीमध्ये व अनुभवातून त्या सक्षम बनले आहेत. पाच जिल्ह्यातील पदवीधरांचा त्या नेतृत्व करत असल्याने त्याबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विशेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – पुणे,मेकॅनिकल अँड डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये एम.ई. (पुणे विद्यापीठ)फायनान्स अँड मॅनेजमेंटमध्ये एम.एस. (क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी, ब्रिटन येथील उच्च पदवीधर असल्याने जागतिक घडामोडीचाही त्यांचा अभ्यास आहे.के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट (ट्रिनिटी ग्रुप)च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचीही त्या जबाबदारी पार पाडत आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य म्हणून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.ड्रीम सोशल फाउंडेशन’च्या संस्थापक-संचालक पदावर न्याय देताना महिला सक्षमीकरण, ग्रामीण शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात काम करत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण ,खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या दुष्काळाबाबतही महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध साठी त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
आमदार हर्षदा प्रभाकर देशमुख – जाधव यांच्या कार्याची ओळख निर्माण झाल्यामुळे त्यांना यापूर्वीच प्रतिष्ठित असा राजमाता जिजाऊ स्त्री शक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा त्यांचा व्यक्तिगत कामाचा गौरव आहे. सामुदायिक रित्या त्यांच्याकडे खूप मोठी मजल असल्याने त्या भविष्यात राज्याच्या राजकारणातील तेजस्वी तारिका म्हणून प्रकाश झोतात आलेले आहेत. अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाले आहे. यावेळी नेत्यांची नाही पण मतदारांचे ठरलं आहे. त्यामध्ये कुणीही बाधा आणू नये. असेही संदेश दिला जात आहे.




