सातारा : साताऱ्यात विविध समस्या मांडण्यासाठी अनेक जण पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवतात. काहींना न्याय मिळतो. काहींच्या प्रश्नावली नंतरही बातम्या लागत नाही. असे असताना साताऱ्यात चक्क पत्रकार भवन मध्ये झालेल्या एका वादग्रस्त पत्रकार परिषदेमध्येच आयोजक व पत्रकारांमध्ये तू.. तू.. मै.. मै.. झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच पत्रकार परिषद उरकण्यात आली. याबाबत माहिती अशी की, सातारा शहर पत्रकार संघटनेच्या वतीने गोडोली येथे सुसज्ज असे पत्रकार भवन बांधण्यात आले आहे. पत्रकार परिषदेसाठी निरोप आल्यानंतर अनेक दैनिक, यू ट्यूब व साप्ताहिकाचे प्रतिनिधी उपस्थित राहतात. आयोजकांच्यावर बातमीच्या अनुषंगाने आवश्यक व योग्य प्रश्नाचे सरबती करतात. काही प्रश्न योग्य असतात. परंतु, त्याला व्यापक प्रसिद्धी मिळत नाही. अर्धा ते पाऊण तास फक्त पत्रकार परिषदेच्या नावाने पत्रकार भवन मध्ये चर्चा केली जाते. यातून काही आउटपुट निघत नाही. त्यामुळे बऱ्याच पत्रकार परिषदेला काही दैनिकाचे व मोठ्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक उपस्थित राहत नाहीत. किंवा लवकर बाहेर पडतात. काही वेळेला आयोजकांनी पत्रकार परिषदेचे पैसे भरूनही काही हाती लागणार नाही असे समजून काही पत्रकार वेळेत उपस्थित राहत नाहीत . याला कोणी दुजोरा किंवा समर्थन करत नाहीत . अर्थात हा एकमेकांच्या गुप्त समझोता असला तरी याबाबत आता पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेणे आवश्यक बाब बनली आहे. सातारा नगर परिषदेमधील अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख पदावर कार्यरत असणाऱ्या एका प्रभारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मंडप व इतर परवानगी देण्यात आली. याबाबत आक्षेप घेऊन मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता गोडोली येथील पत्रकार भवन मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत नियमावलीच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव सूचनांचे पालन करणे. पालन न होणे. यासंदर्भात एका ज्येष्ठ पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे वादाला तोंड फुटले. व्यक्तिगत पातळीवर टीकाटिपणी करून पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोप करण्यात आले. एका पत्त्यावर परवानगी आणि दुसऱ्या पत्त्यावर गणेश मूर्ती स्थापना झाल्याचे आयोजकांचे म्हणणे होते. यासाठी अमर उपोषण करणार असल्याची तसेच विष प्राशन करण्यासंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यासाठी माहितीचा अधिकार वापरून कागदपत्र गोळा करून पत्रकारांना दाखवली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देणे. अपेक्षित असताना मी सांगतो तेच खरे.. माझ्याकडे पुरावा आहे असा दोन्ही बाजूने दावा केल्यामुळे वाद विकोपाला गेला. पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलेली माहिती किंवा निवेदन प्रसिद्ध करणे. हे प्रत्येक उपस्थित पत्रकार किंवा इतरांना बंधनकारक नाही. किंबहुना पत्रकार परिषद म्हणजे प्रसिद्धी माध्यमाच्याद्वारे इतरांची माहिती देणे. याबाबत बातमी करणे असा होत नाही. त्याची पुन्हा एकदा आठवण करून द्यावी वाटत आहे. सध्या पत्रकार परिषद म्हणजे काहींना फक्त गर्दी करण्यासाठी आपल्याला निमंत्रण दिले आहे. असे वाटते तर काहीजण प्रामाणिकपणाने पत्रकारिता करून बातमीला सत्यता पडताळून न्याय दिला जातो. कालचा प्रकार हा मनाला वेदनादायक असल्या तरी याबाबत समंजसाची भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा व्यक्तिगत हेवेदावे यासाठी पत्रकार परिषद बंद करून ज्यांना प्रसिद्ध हवी असेल त्यांनी आपापल्या परीने परस्पर दैनिक , यू ट्यूब व साप्ताहिक चालकांशी संपर्क साधावा. असा निर्णय पत्रकार संघटनेने घेण्याची मागणी काही पत्रकारांनी केली आहे. दरम्यान, पत्रकारांबद्दल आक्षेपहार्य आरोप करणे. मान्य नसून एखाद्या मुद्द्यावर वैचारिक मतभेद असू शकतात. पण, कुणीही मनभेद करू नये. अशी विनंती करण्यात आली आहे. पत्रकार संघटनेच्या एकजुटीचे या निमित्त दर्शन झाले आहे.



