वाई (अजित जगताप) : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जनता अर्बन सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवून परिवर्तन पॅनलने क्रांती घडवली. दीड हजार मतांच्या फरकाने परिवर्तन पॅनलचे संचालक विजयी झाल्याने संस्थापक पॅनलच्या विरोधात बँकेच्या सभासदांचा असंतोष दिसून आला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य खासदार नितीन काका पाटील आणि युवा नेतृत्व राहुल डेरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचारातही विजयाचे शिल्प दडले होते. गेली ४४ वर्ष एक हाती सत्ता असलेल्या जनता अर्बन बँकेच्या कामगिरीबद्दल सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. तो मतदानातून प्रकट झालेला आहे. ही निवडणूक एकतर्फी झाल्यामुळे ५४ टक्के मतदारांनी मतदान केले. ४६ टक्के मतदारांनी मतदान करण्यासाठी सहभाग घेतला नाही. वास्तविक पाहता या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अनिल क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय वेधले ,स्वप्निल माळी व इतर कर्मचाऱ्यांनी शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. परिवर्तन पॅनलच्या विजयाची नांदी दिसू लागताच वाई तहसील कार्यालय परिसरात परिवर्तन पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी केली . यावेळी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार महेंद्र जमदाडे, तानाजी जाधव, राहुल डेरे, सुभाष नवले, शेखर फरांदे, निळकंठ मोरे, महिला राखीव मतदारसंघातून वैशाली चव्हाण, रेखा पिसाळ, बाळासाहेब सपकाळ, विजय गायकवाड हे १० संचालक निवडून आले. यापूर्वी तात्याबा धायगुडे हे बिनविरोध निवडून आले होते. दीड हजार मतांच्या फरकाने परिवर्तन पॅनलचे संचालक निवडून आल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीन पाटील, सर व्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र सरकाळे, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी सर्व संचालकांचे सत्कार करून अभिनंदन केले. संपूर्ण सातारा जिल्ह्यातून विजयी संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी दुपारपर्यंत मोबाईल द्वारे शुभेच्छाच्या वर्षात होत होता .

फोटो- सातारा जिल्हा बँकेत खासदार नितीन पाटील यांनी सर्व विजयी संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.. (छाया- निनाद जगताप, सातारा)




