चांदोलीःवार्ताहर : रांजणवाडी (ता. शिराळा) येथील गणेशनगर मधील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे चरण गावचे सुपुत्र व मुंबई येथील सोनाई फौंडेशनचे अध्यक्ष- शिवाजी शामराव नायकवडी यांचा नुकताच समाजभुषण पुरस्कार जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिवाजी नायकवडी यांनी मुंबई येथे सोनाई फौंडेशन या सामाजीक संस्थेची स्थापना केली असुन या संस्थेच्या वतीने आजवर विवीध सामाजीक उपक्रम राबवले आहेत तसेच त्यांनी आपल्या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मंडळींचा पुरस्कार देवुन गौरव केला असुन शहरी भागासह ग्रामीण व डोंगरी भागात आपल्या सामाजीक कार्यातुन वेगळा ठसा उमठवला आहे त्यांच्या सामाजीक कार्याचा अढावा घेवुन रांजणवाडी येथील आष्टविनायक मंडळाने नुकताच त्यांना समाजभुषण पुरस्कार देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला.
यावेळी या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,आ.सत्यजित देशमुख,माजी सभापती- हणमंतराव पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत तालुक्याच्या उपसभापती मनीषा पाटील, शंकर मोहिते, विश्वास कारखाना संचालक शिवाजी पाटील व सुहास घोडे-पाटील, मंडळाचे अध्यक्ष संजय बेंगडे, खजिनदार आनंदा कांबळे, सचिव बाबूराव आस्कट, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक सुरेश चिंचोलकर, पै. शिवाजी लाड व राजू पाटील, माजी सरपंच प्रमोद पाटील, सरपंच कोमल मस्कर, सरपंच वैशाली कांबळे, मंगल पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष आनंदराव पाटील आदी मंडळी, ग्रामस्थ, गणेशभक्त व परिसरातील मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




