सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या साताऱ्यात अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. यामध्ये सदर बाजार परिसरातील माळवदे कुटुंबीयांनी आई-वडिलांची स्मृती जपण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रशस्तीपत्र प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
साताऱ्यात डी.जे. डॉल्बी, दहीहंडी, नवरात्र उत्सव, दांडिया यासाठी काही लोकप्रतिनिधी व सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी काही महाभगांकडून विविध आर्थिक थर चढवले जातात. त्यामध्ये फक्त धांगडधिंगा दिसून येतो.
या गोष्टीला सलग पाच वर्ष फाटा देऊन सदर बाजार परिसरातील गोरगरीब, कष्टकरी शेतमजूर, बिगारी कुटुंबातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी माजी सैनिक असलेले व सातारचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक शंकर माळवदे ,सागर माळवदे व त्यांचे कुटुंबीय नियमित प्रयत्नशील असतात. आई-वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी दरवर्षी भारत माता पतसंस्थेतून ठेवीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी खूपच मदत होते.
सातारा सदर बाजार येथील श्रुती महेश बनसोडे, लक्ष्मी शिव कांबळे, गौरव राजू कांबळे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती व प्रशस्तीपत्रक देण्यात आले . आर्थिक कारणामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी माळवदे बंधूंनी खारीचा वाटा उचलला आहे. जास्तीत जास्त होतकरू व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्यात समाविष्ट करून घेण्याचा मनोदय माजी उपनगराध्यक्ष व माजी सैनिक असलेले विद्यमान सातारचे नगरसेवक शंकर माळवदे यांनी सांगितले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय इंगवले, संतोष रसाळ, योगेश भोसले , गणेश शेलार, संदीप साखरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सुजित जाधव, राहुल धुमाळ ,सतीश कांबळे ,राजेंद्र रजपूत, राजेंद्र भणगे, गणेश भोसले, कृष्णा जाधव, प्रवीण थोरात, श्रीमती वेणूताई यादव,सुनील भुतकर, सुजित शेख, विकास धुमाळ , चेतन सोळंकी व सभासद उपस्थित होते.
____________________________
फोटो*- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करताना शंकर माळवदे, संदीप साखरे ,,विकास धुमाळ, सुनील भुतकर व चेतन सोळंकी व मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)




