ताज्या बातम्या

कार्वे, कराड रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

कराड : कार्वे परिसरातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र समोर आले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व इतर टाकाऊ वस्तूंमुळे परिसराचे विद्रूपीकरण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या कडेला कचरा साचल्याने दुर्गंधी तसेच पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वीही कराड परिसरातील रस्त्यालगत कचऱ्याच्या समस्येबाबत वृत्त समोर आले आहे.
संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने कचरा हटवून परिसराची स्वच्छता करावी, नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Scroll to Top