सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्हा अतिरिक्त पोलीस अध्यक्षपदी नांदेड इथून पोलीस अधिकारी सुरज गुरव यांची महाराष्ट्र गृह विभागाने बदली केली आहे. एक कर्तव्यदक्ष व सामान्य माणसाची नाळ असणाऱ्या पोलीस अधिकारी श्री गुरव आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील हे हस्तक्षेप व गुन्हेगारी कमी करण्यास मदत होण्याची सामान्य माणसांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस अधिकारी श्री सुरज गुरव यांची नांदेड येथील अपर पोलीस अधीक्षक पदावरून सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सातारा जिल्हा पोलीस दलात अतिरिक्त पोलीस अध्यक्षपदी कार्यरत असणाऱ्या
डॉ. वैशाली कडुकर यांची साताऱ्यातून सीआयडी विभाग पुणे येथे बदली झाली आहे . त्यांच्या जागेवर श्री सुरज गुरव यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवार दिनांक ते पदभार स्वीकारतील अशी माहिती मिळाली आहे.




