नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची मासिक जिल्हा आढावा बैठक नवी मुंबई जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघटना बळकट करणे, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ. गीता चापके यांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडमधील तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये सुभाष खैरे, अमोल सातपुते, अजय जिदे, अशोक कांबळे, सुनील सूर्यवंशी, खार गायकर, कैलास गारडी, सुरेश उर्डे, मनीषा खैरे, कविता होले, प्रीती पाटील, सुविधा साळुंखे आणि सतीश शिंगरे यांचा समावेश आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या बैठकीत नव्या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईतील पक्ष संघटनेला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




