ताज्या बातम्या

मुंबई मेट्रोच्या प्रवासी एटीएम कार्डवर चक्क १ जानेवारी १९७० ची तारीख! तांत्रिक त्रुटी की प्रशासनाचे दुर्लक्ष? प्रवाशांकडून मेट्रो प्राधिकरणाला जाब

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात बेस्ट बस, लोकल रेल्वे आणि मेट्रो अशा विविध सार्वजनिक वाहतूक सेवांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. जलद, सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासासाठी अनेक प्रवासी मेट्रोला पसंती देत आहेत. तिकीट खरेदीचा वेळ वाचवण्यासाठी आगाऊ रक्कम भरून वापरल्या जाणाऱ्या मेट्रो प्रवासी कार्डचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
मात्र, याच कार्डद्वारे प्रवास केल्यानंतर मिळणाऱ्या तिकीट पावतीवर नोव्हेंबर २०२६ ऐवजी चक्क १ जानेवारी १९७० ही तारीख छापून येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार संगणकीय यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे होत आहे की अन्य कोणत्या कारणामुळे, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Scroll to Top