ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या वाढ दिवशीच अंगणवाडी सेविकेच्या सत्य कथन बाबत नोटीस..

पुणे

(अजित जगताप) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याची कामगिरी केल्याबद्दल मोठी जाहिरात बाजी केली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला अंगणवाडी मध्ये येणाऱ्या पोषण आहारातील वाटाणा शिजत नसल्याची तक्रार समाज माध्यमावर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला नोटीस पाठवल्याने खळबळ माजली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्य परिस्थिती कथन केल्यामुळे महिला व बालकल्याण खात्याचे कल्याण चांगलेच शिजून निघाले आहे. ठाकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील अंगणवाडी सेविका रेशमा पारधी या गेले १८ वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होत्या. अंगणवाडी मध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या आहारामध्ये अनेक त्रुटी असून सुद्धा त्यांनी मौन धारण केले होते. सुदैवाने राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून अनेक भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या विरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईचे समर्थन व अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्न साहित्य आहाराबाबत लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका पारधी यांनी समाज माध्यमाद्वारे हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. दहा वेळा कुकरची शिट्टी वाजवून सुद्धा वाटाणा शिजत नसल्यामुळे लहान मुलांच्या पोटाचे विकार वाढू लागले होते. अंगणवाडी पोषण आहाराचे काम पाहणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष द्यावे अशी विनंती करणारी व्हिडिओ तयार करून प्रसारित केली होती. याचा राग आल्यामुळे शासकीय इमारत, सरकारी गणवेश व पदनामाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून अंगणवाडी सेविकेवर नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशीच हा प्रकार उघडकीस आल्याने मेरे मन को भाया.. कुत्ता काटके खाया.. या वाक्य प्रयोगाचा आता अनेकांना अर्थ कळू लागलेला आहे. अशी चर्चा सुरू झालेली आहे. अंगणवाडी सेविकेंना दर महा तेरा हजार मानधन देतात. म्हणजे अंगणवाडी सेवीकेवर फार उपकार करत नाहीत. वेळेत मानधन मिळत नाही. सरकारी अधिकारी कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी झाल्याचा व्हिडिओ पाठवतात. त्याच्यानंतर त्याबाबतच्या त्रुटी आढळून येतात तरीही कोणालाही नोटीस पाठवली जात नाही. अंगणवाडी पोषण रेकॉर्ड ठेवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भत्ता वेळेत मिळत नाही. असे अनेक प्रश्न असून सुद्धा त्याबाबत भाजप सरकार कार्यवाही करत नाही. दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाच्या करातून मिळालेल्या पैशाची उधळपट्टी करून भाजप पंतप्रधान वाढदिवसाची जाहिरात बाजी केली जाते. कोट्यावधी रुपयाची खैरात वाटली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पद भूषवत असले तरी भ्रष्टाचाराने ही सीमा गाठली आहे. हेच या निमित्त उघड झाल्याने एका सामान्य अंगणवाडी सेविकेने दाखवलेला आरसा हा खऱ्या अर्थाने मानबिंदू ठरला आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अंगणवाडी व शालेय पोषण आहाराच्या वाटपासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील ठेकेदारांनी जाळे विणले आहे. हे जाळे नष्ट काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांनी लक्ष घालावे अशी मागणी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे……………………………… फोटो -अन्न व औषध पासून आयुक्त तुकाराम मुंढे व ठाकरवाडी येथील अंगणवाडी सेविका रेशमा पारधी

Scroll to Top