मुंबई : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. असे स्पष्ट करून विषमतेचे हिंदुत्व नाकारले होते. मानवतावादी बौद्ध धम्म स्वीकारला. तरीही आजही महामानव डॉक्टर आंबेडकर यांचे हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. हा मुंबईतील आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. एवढेच नव्हे तर हनुमान रुपी चित्र प्रदर्शनातून बाहेर काढण्यास भाग पाडले. याबद्दल आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांचे विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांचे हनुमानाच्या
अवतारातील असलेले चित्र मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जहांगीर
आर्ट गॅलरी येथील प्रदर्शनामध्ये
भरवण्यात आले होते. या ठिकाणी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्री
हनुमानाच्या
रूपात पुस्तक घेऊन आकाशात
भ्रमंती करीत असल्याचे चित्र दाखवले
होते. याबाबत आर.पी.आय.चे
कार्यकर्त्यांना माहिती मिळाली
असता त्यांनी त्वरित जहांगीर आर्ट गॅलरी येथे जाऊन व्यवस्थापक व चित्रकार यांना जाब विचारला. हे हनुमानाच्या स्वरूपातील
असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पेंटिंग बुद्धिभेद करणारे आहे. ते त्वरित उतरवण्याची सूचना केली.
यासाठी जागरूक असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ
इंडिया दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत करण्यात आले होते. यामध्ये
कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
हनुमानाचे रूपात दाखवणे म्हणजे फार मोठी गंभीर चूक आहे. आणि ही चूक यापुढे घडणार नाही. अशी ग्वाही जहांगीर आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापक के. जी. मेनन मॅडम यांनी दिली. तसेच या चित्राबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर म्हणजे महामानव असून सर्व जाती धर्माच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य म्हणूनच ते सर्वांसाठी दैवत आहे. हे जरी खरे असले तरी त्यांना हिंदू दैवत प्राप्त करून
हनुमानाचा रूप दाखवून चित्र काढणे हे योग्य नाही. घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा- शील- करुणा
माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचा संदेश दिला. त्याचे पालन करूनच शांततेत आंदोलन झाले.
चित्रकार राजेश केदारे यांनी देखील आपली चूक मान्य करून माफी मागितली आहे. अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी माहिती दिली आहे.. यावेळी
आरपीआय दक्षिण मुंबईचे तालुका अध्यक्ष विशाल भाई दिवार आणि
जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोहर जाधव, जेष्ठ कार्यकर्ते डॅ. राजेंद्र जाधव, डॉ. रमेश ईपाकायला, तालुक्यातील कार्यकर्ते,
वॉर्ड पदाधिकाऱ्यांसह, मुंबई प्रदेश
चे सुनिल गरूड, इत्यादी पदाधिकारी
उपस्थित होते. भविष्यात जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कोणते प्रकारचे चित्र लावताना कुणाच्याही भावना दुखवू नये याची काळजी घ्यावी. असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्ह्यात काही समाजकंटक हे समाज माध्यम व इतर बॅनरबाजीतून युगपुरुषांच्या प्रतिमेशेजारी आपली छबी दाखवताना उंची तपासत नाहीत. भान ठेवत नाहीत. अशा बॅनर पोस्टर व समाज माध्यमावरील पोस्ट बाबतही अनेक अनेक आक्षेप घेतली आहेत. अशा बॅनर मुळे धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आल्याचे ज्येष्ठ आर.पी.आय. व भीमशक्तीचे कार्यकर्ते गुलाबराव बनसोडे, अरुण पवार व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले आहे. बौद्ध धम्म स्वीकारताना नागपूर या ठिकाणी बावीस प्रतिज्ञांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी देव- देवता यांचा अस्तित्व नाकारले आहे. विज्ञानवादी व मानवतावादी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. याची आठवण करून दिली आहे. …………………………………. फोटो – हनुमान रुपी फोटो जहांगीर आर्ट येथून बाहेर काढताना कार्यकर्ते…




