ताज्या बातम्या

शिक्षकांचा मेढ्यात गौरव पण जावळीत प्राथमिक शाळेकडे लक्ष देण्याची मागणी…

सातारा(अजित जगताप ) : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्ये एकेकाळी शैक्षणिक गुणवत्ता राखण्याची जबाबदारी जावळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी ते सामान्य शिक्षकांनी तसेच पालकांनी पार पाडली होती. हा जावळी पॅटर्न संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरला होता. आता अवस्था बिकट झाली असून शिक्षक व गुणवंतांचा सत्कार व्हावा. पण जावळीतील प्राथमिक शाळेच्या अवस्थेकडे लक्ष द्या. अशी मागणी पालकांकडून होऊ लागलेली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात प्राथमिक शाळांची अवस्था अतिवृष्टीमुळे व भौगोलिक परिस्थितीमुळे बिकट झालेली आहे. डोंगराळ, दुर्गम आणि अतिवृष्टीचा भाग असलेल्या ठिकाणी लोक सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु शासकीय पातळीवर उदासीन धोरण असल्याने शिक्षक मिळत नाही. प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. हवामानाशी संबंधित अनेक समस्यांचा सामना प्राथमिक शाळेच्या भिंतींना करावा लागत आहे.
दहीहंडीसाठी निधी आहे पण जावळीतील प्राथमिक शाळेच्या सुविधांसाठी साठी निधी नाही. अशी तक्रार मेढा भागातील पालकांनी केली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या काही भागांमध्ये फार बिकट अवस्था आहे. जावळीतील पूर्वीच्या लोकप्रतिनिधी बांधलेल्या मजबूत शाळेच्या खोल्या जुन्या झाल्या आहेत. नवीन खोल्याची त्वरित पडझड होत आहे. ठेकेदारांना जाब विचारला जात नाही. अतिवृष्टीमुळे छतांना तडे जाणे, पावसाळ्यात वर्गखोल्या गळणे आणि भिंती कमकुवत होणे अशा समस्या जावळी तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. जावळीतील सुमारे ३० हून अधिक शाळा अत्यंत दुर्गम आणि दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जो मुठीत घेऊन प्राथमिक शाळेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या जीवाची भीती वाटत आहे. डोंगराळ वाड्या-वस्त्यांवरून होणारे स्थलांतर आणि इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल यामुळे जावळी तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या खूपच घटली आहे. याला सर्वस्वी काही शिक्षक सुद्धा जबाबदार आहेत. ते शहरात राहून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देतात अशी तक्रार जावळीचे सुपुत्र व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी करून सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन सुद्धा केले होते.
काही प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ५ पेक्षाही कमी झाली आहे. ही शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील काही शाळांची निवड ‘मॉडेल स्कूल’ (आदर्श शाळा) म्हणून करण्यात आली आहे. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, संरक्षक भिंती, पेव्हर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग (जलपुनर्भरण) यांसारख्या आधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. दुर्गम भाग असूनही काही गावांमधील लोकसहभाग आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा आणि डिजिटल स्क्रीन सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी शिक्षणप्रेमी झटत आहेत. त्यांचे खरं म्हणजे कौतुक केले पाहिजे परंतु आता राजकीय पक्षाच्या लोकांचा कौतुक सोहळा गुणगौरव व प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे. अशीही टीका सुरू झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील पूर्ण केले जाते.
जावळी तालुक्यातील अतिदुर्गम व मागास भागातील काही प्राथमिक शाळेला जाण्यासाठी रस्ता नाही. संरक्षक भिंती नाहीत. अनेक दिवस प्राथमिक शाळेच्या
स्वच्छतागृहांची नादुरुस्ती होऊ नये त्याकडे लक्ष दिले जात नाही. जावळी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांची समस्या गंभीर आहे. अनेक ठिकाणी जुनी स्वच्छतागृहे पाण्याच्या अभावामुळे किंवा देखभालीअभावी वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. दुर्गम गावांमधील शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित स्वच्छतागृह असणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.
डोंगराळ भागातील शाळांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. काही शाळांमध्ये ग्रामपंचायतीच्या नळ योजनेद्वारे पाणी दिले जाते, परंतु दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर पाणी पोहोचवण्यात तांत्रिक अडचणी येतात. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे जलवाहिन्या फुटल्यास अनेक दिवस शाळांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.
‘आदर्श शाळा’ आणि डिजिटल क्लासरूम: सातारा जिल्हा परिषदेच्या ‘मॉडेल स्कूल’ (आदर्श शाळा) योजनेमुळे जावळी तालुक्यातील काही मोठ्या आणि केंद्रीय शाळांमध्ये डिजिटल स्क्रीन, संगणक लॅब आणि प्रोजेक्टर बसवण्यात आले आहेत. अशा शाळांमध्ये विद्यार्थी आधुनिक पद्धतीने शिकत आहेत.
इंटरनेट आणि वीज पुरवठ्याचे आव्हान: तालुक्यात डिजिटल साहित्याचा पुरवठा झाला असला, तरी दुर्गम आणि अतिवृष्टीच्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी (नेटवर्क नसणे) ही सर्वात मोठी समस्या आहे. तसेच, पावसाळ्यात अनेक दिवस वीज पुरवठा खंडित होत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून दिलेले डिजिटल साहित्य कित्येक दिवस बंद अवस्थेत पडून राहते.
जावळी तालुक्याच्या शिक्षण विभागालाही पायाभूत सुविधांच्या समस्येचा सामना करावा लागत शाळांच्या दुरुस्ती प्रस्तावांना गती मिळण्यास उशीर होतो. एकशिक्षकी डोंगराळ वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे जावळी तालुक्यातील अनेक दुर्गम शाळा सध्या ‘एकशिक्षकी’ (एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी) किंवा शेजारच्या शाळांमधील शिक्षकांना तात्पुरते ‘डेप्युटेशन’ (समायोजन) देऊन चालवल्या जात आहेत.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला मिळणाऱ्या ३५७ नव्या शिक्षकांपैकी दुर्गम भाग म्हणून जावळी तालुक्याला प्राधान्याने शिक्षक मिळण्याची शक्यता आहे, त्याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.

———————————————–

फोटो– जावळी तालुक्यातील प्राथमिक शाळेची इमारत

Scroll to Top