अलिबाग(दिनेश तुरे) : माजी विरोधी पक्षनेते दिवंगत दत्ता पाटील साहेब यांचे को .ए.सो. जनता विद्यालय बेलोशी, तालुका – अलिबाग , जिल्हा -रायगड या हायस्कुल मधील एस. एस. सी. बॅच -१९८९ यांच्या मैत्रीचा आनंदमय सोहळा अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागाव नगरीतील प्रसिद्ध वातावरण रिसॉर्ट मध्ये कोजागिरीच्या सणाचे औचित्य साधुन रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदमय वातावरणात मैत्रीचा व आपुलकीचा धागा घट्ट पकडून संपन्न झाला आहे , याप्रसंगी ३५ मित्र / मैत्रिणी यांनी उपस्थित राहुन ३७ वर्षाचा मैत्रीच्या भेटीचा दुष्काळ संपविला . यासाठी मित्रवर्य महेंद्र औचटकर यांचा पुढाकार वाखाणण्याजोगी आहे , त्यानां सर्वांची तोलामोलाची साथ लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीयुत शिक्षक मित्र नितीन वारगे व दिनेश तुरे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले , या कार्यक्रमाची सुरुवात अविरत मेहनत घेणारे अरुण खंडागळे व सहकारी यांच्या हस्ते करण्यात आली . तसेच भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार सर्व मित्रांच्या हस्ते प्रतिमा पुजण करण्यात आले व उपस्तिथ मैत्रिणी यांच्या हस्ते प्रकाशमय दीप प्रज्वलित करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . दिनेश तुरे यांनी आपल्या दिवंगत मित्रानां – प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर , कोरोना मधील दिवंगत नातेवाईक व सीमेवरील शहीद सैनिक या सर्वाना श्रद्धांजली वाहिली , सर्व मित्र आपल्या दिवंगत मित्रांच्या आठवणीत निशब्द झाले . शिक्षक मित्र श्री नितीन वारगे यांनी सदर कार्यक्रमाची प्रास्ताविकाद्वारे छान सुरुवात केली . तसेच दिनेश तुरे यांनी 37 वर्षाच्या मैत्रीच्या भेटीची ओढ व होणारा आनंद सविस्तर विषद केला . सौ भारती मोरे यांनी देखील मित्र व मैत्रीचा भेटीचा दुष्काळ संपल्याबद्दल आनंद व्यक्त केला व प्रत्येक मैत्रिणींची सविस्तर माहिती देऊन त्याचे स्वागत केले . सर्व मित्रांची माहिती नितीन वारगे व दिनेश तुरे यांनी दिली व टप्प्याटप्याने सर्वांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रत्येक मित्र व मैत्रिणी यांनी ३७ वर्षातील आपल्या मैत्रीचा दुष्काळ , वैवाहिक जीवन , मुलांची माहिती व पत्नीचा आधार अघोरीत करून आपली शाळा व जुन्या आठवणींना व आपल्या मैत्रीला उजाळा दिला व हास्याचे फवारले उडविले . श्रीयुत नितीन वारगे, दिनेश तुरे व भारती मोरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमात रंगत आणली व शिक्षिका शरयू काटले व रंजना तुरे याची देखील उत्तम साथ लाभली . तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री निवास पाटील , श्री अरुण खंडागळे , श्री किशोर वारगे , महेश पाटील, सुजीत पाटील , रवींद्र शिंदे , उदय सांदणकर , दिनेश तुरे , शिरीष तुरे , महेश गावंड , जगदीश चेरकर , व सर्वच मित्र / मैत्रिणी यांनी दूरवरून येऊन अमूल्य वेळ देऊन व प्रचंड मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास खारीचा वाटा उचलला . तसेच महेश पाटील यांनी सर्व मैत्रिणीना साडी घेतली व मैत्रिणी यांनी देखील आपल्या भावाला राखी बांधून व सुंदर गिफ्ट देऊन आपल्या भावाची ओवाळणी करून त्यांचे स्वागत केले . तसेच सदर कार्यक्रमाचा मध्यंतर झाल्यानंतर आचारी मित्र महेश व त्यांचे सहकारी यांनी बनविलेल्या लज्जतदार भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला व यात अनेक पदार्थांची रेलचेल होती . महेंद्र औचाटकर यांनी छान भावगीत कथन केले व शिरीष तुरे यांनी बहारदार महाराष्ट्रगीताचे गायन केले . तसेच भक्ती माझी भोळी या गाण्यावर महेश पाटील , महेंद्र औचाटकर , दिनेश तुरे , किशोर वारगे , सुधीर ठाकूर व मित्रमंडळ यांनी अप्रतिम डान्स करून सर्वानाच मंत्रमुग्ध केले . याप्रसंगी सर्वजण सुख -दुःख विसरून बालपणीच्या व शाळेच्या आठवणीत रमले. ज्योती तेलगे यांनी सर्वाना पॉकेट , रंजना तुरे यांनी पेन , तसेच सुधीर ठाकूर यांनी सर्वांच्या वतीने व सर्वांचे फोटो असणारा कपाची आकर्षक ट्रॉफी सर्वाना भेट देण्यात आली .
तसेच वातावरण रिसॉर्टचे मालक श्रीयुत राजाराम पाटील साहेब व त्यांचा सहकारी स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले . स्टेजसजावट व साउंड सिस्टीम यांची जबाबदारी महेश पाटील यांनी उत्तम सांभाळली . थेरोंडा येथील महेश यांनी छान फोटोग्राफी केली या कार्यक्रमानिमित्त ३७ वर्षाच्या भेटीला व आठवणीला पुन्हा उजाळा मिळून , विचारांची देवाणघेवाण करण्यात आली . शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण होऊन सर्वजण आपल्या बालपणीत हरवले , कार्यक्रमाद्वारे सकारात्मक ऊर्जा मिळाली . शिक्षक मैत्रिणी सौ . शरयू काटळे व सौ . रंजना तुरे व सहकारी यांनी पसायदानाचे गायन करून सदर कार्यक्रमाची सांगता केली . श्री दिनेश तुरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या आपल्या सर्व मित्र / मैत्रिणी यांचे व ईतर सर्वांचे आभार मानले.
सर्वांच्या मेहनतीच्या व मैत्रीच्या एकीच्या बळावर आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला . १९८९ च्या बालपणीच्या आठणीचा काळ पुन्हा अनुभवाला मिळाला . आयुष्याच्या वळणावर मैत्रीचा धागा असाच घट्ट करू या ! आपली शाळा म्ह्नणजे फक्त शिक्षणाचे ठिकाण नाही तर आठवणींचे घर आहे , तिथे आपण वाढलो , खेळलो , बागडलो , जगण्याची प्रेरणा मिळाली , ज्या गुरुवर्य शिक्षकांनी आयुष्याला दिशा दिली व मित्रांनी आधार दिला त्या सर्वांचे आभार . शाळा हीच अशी जागा आहे जी आठणींची पहिली पायरी आहे , तिच्या खडूच्या धुळीत स्वप्न लिहली गेली . त्या शाळेला व शिक्षकांना प्रणाम दंडवत ! प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी – उत्तम आरोग्य व समाधान नांदो ! शाळेच्या आठवणी अशाच चिरतरुण राहो !मनात एकाच भावना पुन्हा भेटू , पुन्हा भेटू , आणखी सुंदर आठवणी घडवू ! एकंदरीत हा गेट टुगेदर अर्थातच जिवलग मित्रांचा स्नेहमेळावा जल्लोषात संपन्न झाला .




