मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य स्थान असलेल्या अपना सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ आणि उमदे व्यक्तिमत्त्व आदरणीय दत्ताराम चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी नायगाव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे तसेच शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश यमुनाई गणपत काळे, अपना सहकारी बँकेचे संचालक अनिल ठाकूर आणि राजाराम नारकर उपस्थित होते.
दत्ताराम चाळके यांनी आपल्या सेवाकाळात सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, जपलेली कर्तव्यनिष्ठा आणि दिलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा अनेकांना प्रेरणादायी आदर्श मिळत आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समाधान, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच त्यांच्या हातून समाजहिताचे व सहकार क्षेत्राच्या विकासाचे कार्य निरंतर घडत राहो, अशा सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.




