मुंबई : धगधगती मुंबई वृत्तपत्र परिवारातर्फे यंदाही गणेशभक्तांसाठी आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र बाजार पेठेचे अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे सर यांच्या शुभहस्ते या आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, प्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे पाटील, विशाल चाफे आणि संपादक भीमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.
धगधगती मुंबई परिवाराच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सव तसेच आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना उपयुक्त ठरावा, या उद्देशाने आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्राचा गणेश उत्सव’ या पॉडकास्टच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांचे सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविले जातात. तसेच नवरात्रोत्सवानिमित्त ‘नवदुर्गा : एक प्रेरणा’ या उपक्रमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कार्याला आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्यही धगधगती मुंबई परिवार करीत आहे.




