ताज्या बातम्या

परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या ट्रस्टीची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिष्टमंडळाची भेट

मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक/अध्यक्ष श्री.मंगेशजी चिवटे व कार्याध्यक्ष श्री राम हरी राऊत यांच्या सूचनेनुसार व रुग्णांच्या नातेवाईकांच्या लेखी तक्रारीनुसार गेल्या पाच महिन्यापासून वाडिया रुग्णालय परळ येथे दाखल असलेल्या उत्तर प्रदेश जौनपुर जिल्ह्यातील बदलापूर येथील काजल द्विवेदी शुक्ला यांच्या एम.आई.सी.यू. बाळा संदर्भात वाडिया रुग्णालयाच्या ट्रस्टी डॉ.मिनी बोधनवाला,डॉ.विनय जोशी,डॉ.निधी मॅडम यांच्याशी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या बाळाच्या उपचार प्रक्रियेची माहिती घेतली. शिवाय सविस्तर चर्चा करण्यात आली.रुग्णांच्या नातेवाईकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.याप्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ, मुंबई सचिव डॉ.नवीन शेवाळे,शिवडी विधानसभा प्रमुख श्री.प्रमोद बामने, धारावी विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.विजय शिंदे,शिवाजी नगर विधानसभा सचिव श्री.गणेश लोंढे,ईशान्य मुंबई सहसचिव श्री.समीर भंडारे,प्रभाग क्र.१३५ चे सचिव श्री.सुदेश पांडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Scroll to Top