ताज्या बातम्या

उंडाळे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; कचरा टाकणाऱ्यांना अनोख्या पद्धतीने इशारा!

उंडाळे : गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उंडाळे ग्रामपंचायतीने अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, यासाठी ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी आकर्षक सूचना फलक लावले आहेत.
“कचरा टाकणं गाढव आहे. येथे कचरा टाकू नये, टाकल्यास दंडात्मक कारवाई होईल,” असा संदेश देत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले आहे. फलकावर गाढवाचे चित्रही वापरण्यात आल्याने हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गावातील रस्ते, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
उंडाळे ग्रामपंचायतीच्या या अनोख्या जनजागृती उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, “स्वच्छ गाव—सुंदर गाव” संकल्पनेला अशा उपक्रमांची जोड मिळणे गरजेचे आहे.

Scroll to Top