
सातारा(अजित जगताप) : साताऱ्यात विधायक उपक्रमाने चळवळ उभी करणारे अनेक जण आहेत. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणाने सेवा देऊन सामाजिक भान ठेवणारे अग्रक्रमाने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी दरवर्षी हाफ मॅरेथॉन भव्य स्पर्धा आयोजित करतात.
येत्या चार व पाच सप्टेंबर रोजी
मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने
संपुर्ण देशभरात लोकप्रिय असलेली पी.बी.जी. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा यंदा
१५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा संपन्न होत आहे. यावर्षीच्या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजकत्व पुनित बालन ग्रुप यांच्याकडे असून, सुमारे १० हजार देशी विदेशी व ग्रामीण धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे. हा एक स्पर्धेतील प्रताप मानला जात आहे. महाराष्ट्रातील भव्य आणि लोकप्रिय यंदाच्या एक्स्पोमुळे साताऱ्यातील डी.जे. च्या धांगडधिंगा पेक्षाही शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या मॅरेथॉनने नवी पिढीला चांगला संदेश दिला आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सातारा- कराड रस्त्यावरील शेंद्रे येथील कार्यस्थळावरील कै.
अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात आयोजिक करण्यात आला आहे.
दि. ४ सप्टेंबर
रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायं-
काळी ६ वाजेपर्यंत हा एक्स्पो धावपटूंसाठी खुला राहणार आहे.एक्स्पोचे उद्घाघाटन श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंदसिंहराजे भोसले, साखर कारखान्याचे संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संमतीचे अध्यक्ष आर्कटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहल घायताडे यांनी संयुक्तरीत्या दिली.
या एक्स्पोमध्ये स्पर्धेसाठी आवश्यक असणारे रेस किट स्पर्धकांना वितरित करण्यात आली आहेत. त्यामध्ये टी-शर्ट, रनिंग विब, संगणकीकृत टायमिंग चिप आदींचा समावेश आहे. रेस किट घेण्यासाठी स्पर्धकांनी नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना प्राप्त झालेला ई-मेल अथवा
मोबाईल्वर आलेला संदेश पुरेसा आहे. प्रत्येक स्पर्धकांने वयाचा व रहिवासी पत्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. डॉक्टर संदीप काटे यांनी सांगितले.
सर्व नोंदणीकृत स्थानिक धावपटूंनी आपले रेस किट शक्यतो एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी ताब्यात घ्यावीत जेणेकरून दुसऱ्या दिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या धावपटूंना रेस किट व बिब घेणे अधिक सोयीचे होईल असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे व जॉइंट रेस डायरेक्टर डॉ. दिपक बनकर यांनी संयोजन समितीने केले आहे.भव्य जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आलेल्या संपूर्ण वातानुकुलित एक्स्पोमध्ये रेस किट वितरणाबरोबरच धावपटूंसाठी विविध उपयुक्तउपक्रम, स्पोर्ट्स व फिटनेसशी संबंधित साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.
प्रत्येक खेळाडूची आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक जागरूकतेने लक्ष ठेवून आहे. असे डॉक्टर प्रतापराव गोळे यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेमुळे कुणाचीही गैरसोय होऊ नये. यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे . मॅरेथॉन भव्य.एक्स्पो व स्पर्धेमुळे काही व्यवसायिकांनी दरवाढ किंवा शासनाचे नियम धाब्यावर बसवून गैर कृत्य करू नये. असेही सूचित करण्यात आले आहे………………………….
फोटो – पंधराव्या वर्धापन दिनाच्या मॅरेथॉन भव्य एक्स्पोचे लोगो (छाया- निनाद जगताप)




