ताज्या बातम्या

पुणे विभाग पदवीधर मतदार संघामध्ये पदवीधर आणि पदविकाधारक बंधू – भगिनींनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून सक्रिय सहभाग नोंदवावा.: श्री प्रणव पाटील

कुपवाड : दिवंगत आमदार स्व.प्रा. शरद पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसह पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून सन 2002 मध्ये विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व करून पदवीधरांच्या,बेरोजगार तरुणांच्या तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. सद्या आगामी माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु असून कोल्हापूर,सांगली, सातारा,सोलापूर व पुणे जिल्ह्यातील सन 2022 अखेर पदवी अथवा पदविका धारण करणाऱ्या सर्व बंधू-भगिनींनी आपला फोटो, पदवी / पदविका प्रमाणपत्र, व आधार कार्डाची झेरॉक्स प्रती सह संबंधित तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यलया कडे फॉर्म भरून देऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी.काही अडचण असल्यास आपल्याशी ( मोबाईल क्र.8983798890.) वर संपर्क साधावा असे आवाहन दिवंगत माजी आमदार स्व. प्रा.शरद पाटील यांचे नातू व युवा नेते श्री प्रणव पाटील (सांगली)यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

Scroll to Top