सायगाव(अजित जगताप) : महाराष्ट्राचे दैवत श्री गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होणार आहे. यावेळी मुंबई स्थित कोकणवासीय गणेश भक्त मोठ्या प्रमाणात आपल्या मूळ गावी जातात. त्या महामार्गावर व अंतर्गत रस्त्यावर वाहतूक अडथळा होऊ नये. याचे पूर्ण नियोजन केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महिगाव ता. जावळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात केली. वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी गणेश भक्तांना दिलासा दिला आहे. गोवा महामार्ग तसेच कोकणातील जाणाऱ्या सर्व रस्त्यांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. गणेश भक्तांना प्रवास करताना कोणत्याही त्रास होऊ नये. यासाठी कोकणातील महाड या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी बैठकीचा वृत्तांत व त्याबाबत माहिती दिली. यावेळी माजी आमदार सदाशिव सकपाळ, जावळीचे सभापती सौरभ शिंदे, भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप परामणे,युवा नेते इंद्रजीत भिलारे, मच्छिंद्र मुळीक, दत्ता पवार-मेढेकर, पिंटू मुसळे, संजय निकम, माजी उपसभापती रवींद्र परामणे, मच्छिंद्र क्षीरसागर, संजय निकम, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अशोक भोसले, अँड .शिवाजीराव मर्ढेकर, राजेंद्र फरांदे, संतोष शेलार, सुरेश मोरे, सचिन पाटील, यासह आनेवाडी, रायगाव, सायगाव , महिगाव, सोमर्डी परिसरातील ग्रामस्थ व वारकरी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. वारकऱ्यांना आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. असे स्पष्ट करून नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, हा राजकीय कार्यक्रम नाही. तर खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कुडाळ- बेलोशी रस्त्याचे काम चालू आहे. हुमगाव- बावधन रस्ता बोगदा काढण्यात येणार आहे. संकटाच्या वेळेला माझ्यासाठी जे धावून येतात. त्यांच्यासाठी मी नेहमी उभा राहणार आहे. माझ्यासोबत असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला उघड्यावर टाकून सोडून जाण्याची वृत्ती नाही. असे त्यांनी जावळी तालुक्यातील सर्वच त्यांच्याशी निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने ही त्यांनी ओ.बी.सी. महिलेला ताकतीने निवडून देण्याचाही आवर्जून उल्लेख केला. वारकरी संप्रदायाचा नसलो तरी वारकऱ्यांसाठी फुल नाही फुलाची पाकळी देण्यात सदैव तयार आहे. असाही त्यांनी शब्द दिला. दरम्यान, महिगाव नजीकच्या सायगाव येथील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करावी. अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी केली. या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातील खंबीर नेतृत्व असलेले मंत्री महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला सायगाव परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम लांबल्यामुळे बिचाऱ्या विद्यार्थ्यांना महिगाव येथे ताटकळत राहावे लागले होते. वही हातात पडल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी थेट आपापल्या घरचा रस्ता धरला. ……………………………….. फोटो- महिगाव तालुका जावळी येथे मार्गदर्शन करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व विद्यार्थ्यांना वह्या वाटप (छाया निनाद जगताप, महिगाव)




