ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धाव

नवी मुंबई(अजित जगताप) : दक्षिण आफ्रिकेतील नामांकित कॉम्रेड मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन व अनेक प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग घेतलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज सेंट्रल पार्क, खारघर येथे पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ मध्ये सहभाग घेतला. इतर धावपटून सोबत स्वतःही यशस्वीरीत्या संपूर्ण अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता ही सिद्ध केली आहे.
खारघर या ठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये २१.२ किलोमीटरचे अंतर २ तास २६ मिनिटे २२ सेकंदात पूर्ण केले आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
नवी मुंबई. महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अत्यंत महत्त्वाचा कारभार डॉक्टर कैलास शिंदे हे सक्षमपणे सांभाळत आहेत. भारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिके नंतर नंतर नवी मुंबई महानगरपालिका लक्षवेधी ठरली आहे. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातही डॉ. कैलास शिंदे यांनी दररोज पहाटे लवकर उठून धावण्याचा सराव करतात.
पन्नाशी नंतर खऱ्या अर्थाने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करणे. ही नित्याची बाब झालेली आहे. यामुळे दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होत नाही. अतिरिक्त ऊर्जा लाभते. राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्याचा भर असतो. तर काही वेळा अडचणी निर्माण होतात. परंतु, नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमावली प्रमाणेच काम करावे लागते. त्यामुळे वेळेचे बंधन पाळावे लागते. त्याचबरोबर कामाचाही उरक करावा लागतो. या गोष्टी नेहमीच्या सर्वामुळे चांगल्या पद्धतीने घडवल्या गेल्या आहेत.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा गौरव झाला आहे. मॅरेथॉन स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे .खारघर हिल मॅरेथॉन मधील आणखी एका यशस्वी कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे व ग्रामीण भागातून अनेक जण नवी मुंबई शहरांमध्ये स्थायिक झालेले आहे.
सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत असताना डॉक्टर शिंदे यांनी धावणे स्पर्धेलाही प्राधान्य दिले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरी सुविधा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते नगरसेवक व अधिकारी पदाधिकारी काम करत आहेत. त्या सर्व लोकांच्या सहकार्यामुळेच डॉ. कैलास शिंदे यांना आपल्या शासकीय कामातून नियमित व्यायामासाठी सुद्धा वेळ मिळत आहे. या वेळेचा चांगल्या पद्धतीने ते उपयोग करून नवा पिढीसाठी एक आदर्श निर्माण करत आहे अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

——————————————

फोटो नवी मुंबई खारघर येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये स्पर्धा पूर्ण केल्यानंतर डॉ. कैलास शिंदे (छाया- निनाद अजित जगताप)

Scroll to Top