ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”

मुंबई(ओमकार धुळप) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भुलेश्वर परिसरात गणपती आगमनासाठी नेण्यात येत असलेली तब्बल २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डॉ. आत्माराम मर्चंट रोड, कबुतरखाना, जय आंबे चौक परिसरात ही दुर्घटना घडली. ही भव्य मूर्ती लालबागहून भुलेश्वरच्या दिशेने आगमन मिरवणुकीतून नेली जात होती. मंडपापासून अवघ्या काही अंतरावर असताना अचानक मूर्ती एका बाजूला कलंडली आणि काही क्षणांतच खाली कोसळली.

मूर्ती कोसळल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत संकेत नेवशे आणि ३८ वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या प्राथमिक माहितीनुसार मूर्तीला आधार देणाऱ्या लोखंडी फ्रेमच्या वेल्डिंगमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठ्या गणेशमूर्तींची वाहतूक करताना मूर्तीची संरचना, लोखंडी फ्रेमची मजबुती, वाहतूक व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Scroll to Top