ताज्या बातम्या

झाडांचा ९ वा वाढदिवस : किल्ले वसंतगड बीज महोत्सव २०२६

कराड : किल्ले वसंतगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘झाडांचा ९ वा वाढदिवस व बीज महोत्सव २०२६’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कराड तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती साहिला नाईकवडी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी किल्ले वसंतगड टीमचे सदस्य, माननीय पंचायत समिती सदस्य संग्राम बाबा तसेच आदर्श सरपंच, वहागाव उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि बीज संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Scroll to Top